वाशिमच्या (Washim Accident) कारंजा तालुक्यातील कारंजा पोहा मार्गावर (Karanja Poha Road) तुळजापूर धरणाजवळ (Tuljapur Dam) तिहेरी अपघात झाला आहे. ऑटो रिक्षा आणि पिकअप वाहनांची भीषण धडक झाल्याने एका महिलेसह दोन जणांचा जागेचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 9 जण जखमी झाले आहेत. ऑटोमधील प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त असल्याने मृत्यूसह जखमींचा आकडा वाढला आहे. (Washim Accident)
हेही वाचा-Saif Ali Khan वर हल्ला करणाऱ्या आरोपीला जायचे होते अरब देशात म्हणून ….
जखमींना कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भरधाव वेगात जाणाऱ्या पिकअपने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या प्रवाशी ऑटोला समोरून जोरदार धडक दिली. या प्रवाशी ऑटोच्या मागून मालवाहतूक करणारी ऑटोही येत होती. पिकअपची या ऑटोलाही धडक बसली. या भीषण धडकेत वाहनांचा चक्काचूर झाला. 3 जण जागीच ठार झाले. प्रवाशी ऑटोमध्ये बसलेले 9 प्रवाशी जखमी झाले आहेत. (Washim Accident)
हेही वाचा-CM Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वात दावोसमध्ये पहिल्याच दिवशी ५ लाख कोटींचे सामंजस्य करार !
अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आपत्कालिक संस्था आणि अन्य रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताचा पंचनामा पोलिसांनी केला असून वाशिम पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. कारंजा पोहा मार्गावरील अपघातात पिकअप मालवाहक ऑटो आणि प्रवासी रिक्षाच्या जोरदार धडकेमुळे तिन्ही गाड्यांचा चुराडा झाला आहे. ऑटोमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून स्थानिकांनी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलवले. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Washim Accident)
नेमकं काय घडलं ?
मंगळवारी (21 जानेवारी) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघातात वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. कारंजा -पोहा मार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या पिकअप वाहनाने विरुद्ध दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी भरलेल्या ऑटोला जोरदार धडक दिली. याच रिक्षाच्या मागून दुसरा मालवाहक ऑटो येत होता. या वाहनाची ही पिकअपला धडक बसली. तीन वाहनांच्या झालेल्या या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. ऑटोमधील प्रवासी जखमी झाले असून या अपघातात 9 जण गंभीर असल्याचं सांगण्यात येतंय. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली होती. स्थानिकांनी जखमी प्रवाशांना तातडीने कारंजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्रवाशांवर उपचार सुरू आहेत. (Washim Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community