
उत्तर प्रदेशच्या (UP) प्रयागराज (Prayagraj) येथे सुरू असलेल्या महाकुंभमधून (Maha Kumbh Mela 2025 ) जात असताना झालेल्या अपघातात (Accident News) १० भाविकांचा (Mahakumbh ) मृत्यू झाला आहे. हे भाविक प्रवास करत असलेली कार बस धडकल्याने ही भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेत १९ जण जखमी झाले असून प्रयागराज-मिर्जापुर महामार्गावर (Prayagraj-Mirzapur highway) मेजा भागात बोलेरो कार बसला धडकल्याची माहिती मिळत आहे. (Accident News)
हेही वाचा-Maharashtra Temperature : यंदा फेब्रुवारी महिन्यातच उन्हाळ्याची चाहूल; यंदाचा उन्हाळा किती कडक?
संगमात स्नान केल्यानंतर ते वाराणसीला जात होते. ही टक्कर इतकी भीषण होती की बोलेरोचे मोठे नुकसान झाले. कोणाचा हात तुटला होता तर कोणाचे डोके फुटले होते. बोलेरोमध्ये बरेच लोक अडकले. बोलेरोमधून मृतदेह बाहेर काढण्यासाठी अडीच तास लागले. आयुक्त तरुण गाबा आणि डीएम रवींद्र कुमार मांधड घटनास्थळी पोहोचले. (Accident News)
हेही वाचा-मध्य रेल्वेवर रविवारी Mega block ; वाचा संपूर्ण वेळापत्रक
पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. एसपी यमुनापार विवेक यादव म्हणाले की, बोलेरोमधील सर्व प्रवासी पुरुष होते. गाडीचा वेग खूप जास्त होता. बस चालकाने ब्रेक लावले, पण समोरून येणारी बोलेरो बसवर समोरासमोर आदळली. (Accident News)
हेही वाचा-Mahakumbh बद्दल अफवा पसरवणे महागात पडणार ; 54 सोशल मीडिया अकाउंट्सविरुद्ध एफआयआर दाखल
दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हा अपघाताची तात्काळ दखल घेतली असून अधिकार्यांना तातडीने मदतकार्य करण्याच्या तसेच जखमींवर योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. (Accident News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community