रत्नागिरीतून (Ratnagiri) कुंभमेळ्याला (Mahakumbh 2025) गेलेल्या भाविकांच्या गाडीला शनिवारी (1 फेब्रु. ) पहाटे भीषण अपघात (Accident News) झाला. या अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात आणखी तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात नाशिक (Nashik) जिल्ह्यातील सिन्नर जवळ शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. (Accident News)
हेही वाचा-Mahakumbh Stampede : तिसऱ्या अमृत स्नाननिमित्त पोलिस हाय अलर्टवर ; कडक तपासणी सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, मंगलमूर्ती प्रतिष्ठानचे माजी सरचिटणीस निवृत्त प्रा. प्रताप सावंत देसाई, वाहन चालक भगवान झगडे व अक्षय निकम अशी मृत झालेल्या तिघा जणांची नावं आहेत. रत्नागिरीतील हे सर्व भाविक कुंभमेळ्यातील शाही स्नान आटोपून इनोव्हा गाडीने रत्नागिरीला परत येत होते. यावेळी समोरुन येणाऱ्या डंपरने गाडीला जोरात धडक दिली. त्यामुळे गाडीचा पुढील भाग पूर्णतः उद्ध्वस्त झाला. (Accident News)
हा अपघात इतका भयावह होता की, दोघांचा जागीच मृत्यू झाला. अक्षय निकम यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर काही वेळाने त्यांचा मृत्यू झाला. महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांनी थांबून अपघातग्रस्तांना मदत केली. दरम्यान, हा सगळा गंभीर अपघात झाल्याचे कळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. (Accident News)
हेही वाचा-Nashik-Gujarat Highway वर खाजगी बस कोसळली 200 फूट खोल दरीत; 7 जण जागीच ठार
अपघातग्रस्त इनोव्हा गाडीत माजी प्राचार्य प्रताप सावंत देसाई , निवृत्त शिक्षक रमाकांत पांचाळ, श्रीराम मंदिराचे विश्वस्त संतोष रेडीज, सुप्रसिध्द ऑडीटर किरण निकम, त्यांचे चिरंजीव अक्षय निकम व नातेवाईक प्रांजल साळवी तसेच वाहन चालक भगवान तथा बाबू झगडे असे ७ जण प्रवास करीत होते. यापैकी तिघांचे निधन झाले. यामधील किरण निकम यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. तर संतोष रेडीज, रमाकांत पांचाळ व प्रांजल साळवी यांना काही प्रमाणात जखमा झाल्या परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे. हे सगळे रत्नागिरी खेडशी येथील रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहेत. (Accident News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community