Accident News : मद्यधुंद चालकाचा कारनामा ; एका महिलेसह म्हशीला चिरडलं, नेमकं काय घडलं ?

99
Accident News : मद्यधुंद चालकाचा कारनामा ; एका महिलेसह म्हशीला चिरडलं, नेमकं काय घडलं ?
Accident News : मद्यधुंद चालकाचा कारनामा ; एका महिलेसह म्हशीला चिरडलं, नेमकं काय घडलं ?

खडी भरून अभोण्याकडे सुसाट धावणाऱ्या विना क्रमांकाच्या डंपर चालकाने कुंडाणे गावातील एका महिलेला चिरडल्याने (Accident News) त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर एक म्हैस ठार झाली. सुदैवाने दोन लहान बालके पळाल्याने ती बचावली. या वेळी संतप्त ग्रामस्थ व पोलिसांतील वाद धक्काबुक्कीपर्यंत गेल्याने वातावरण चिघळले. (Accident News)

हेही वाचा-Maharashtra Weather : पावसाचा जोर ओसरला; येत्या दोन दिवसात तापमान कसे राहणार? वाचा सविस्तर …

याबाबत अधिक माहिती अशी की, अभोणा-नांदुरी रस्त्यावरील कुंडाणे गावातील विठाबाई रघुनाथ ढुमसे (Vithabai Raghunath Dhumse) (५०) या म्हशीला आणण्यासाठी घरातून बाहेर येऊन शेतात उभ्या होत्या. एवढ्यात दगड, खडी वाहतूक करणारा डंपर सुसाट आला अन् रस्त्यावरून येणाऱ्या म्हशीला त्याने आधी धडक दिली, त्यात म्हैस ठार झाली. अतिवेगात असलेल्या चालकाने मोरीचा कठडा तोडून वाहन थेट शेतात उभ्या असलेल्या विठाबाई यांच्या अंगावर घातल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे परिवारासह गावकऱ्यांना मोठा धक्का बसला. (Accident News)

हेही वाचा-Crime News : ज्वेलर्स मालकाला अडकविण्याचा कट पोलिसांनी उधळून लावला, पोलीस खबऱ्यासह एका वृत्तपत्र संपादकावर गुन्हा दाखल

अभोणा पोलिस घटनास्थळी आल्यानंतर विठाबाई यांचे भाऊ कैलास ढुमसे (४०) यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांची पोलिसांसोबत धक्काबुक्की झाल्याने एका पोलिसाचे कपडे फाटले. या घटनेची खबर वरिष्ठांना दिल्याने जिल्ह्यातील सात पोलिस ठाण्यांचा लवाजमा घटनास्थळी दाखल झाला. चालक अजय मांगू (Ajay Mangu) (रा. कापसी) या मद्यपी चालकाजवळ वाहन परवानाही नव्हता, अशी माहिती समोर आली. (Accident News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.