Accident News : CSMT जवळ बेस्ट बसने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू !

57
Accident News : CSMT जवळ बेस्ट बसने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू !
Accident News : CSMT जवळ बेस्ट बसने दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू !

कुर्ल्यातील घटना ताजी असतानाच आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) परिसरामध्ये एक अपघात (Accident News) घडला आहे. एका बेस्ट बसने दिलेल्या धडकेमध्ये पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. बुधवारी (११ डिसेंबर) सायंकाळी पोलीस उपायुक्त कार्यालयाबाहेर (झोन 1) वालचंद हिराचंद मार्गावर हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून मयत व्यक्तीची ओळख पटली आहे. (Accident News)

हुसैनियार अंदुनी (Hussainiyar Anduni) (वय 55 वर्ष) असं मयत व्यक्तीचं नाव आहे. या प्रकरणामध्ये एमआरए मार्ग पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. अज्ञात बाईकचालकाचाही या अपघाताशी संबंध असल्याने त्याचाही उल्लेख तक्रारीत आहे. 55 वर्षीय हुसैनियार यांना बेस्ट बसने सीएसएमटी स्थानकाजवळ धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. या व्यक्तीचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे, असं पोलिसांनी सांगितलं. (Accident News)

हेही वाचा-Rajasthan News : बोअरवेलमध्ये अडकल्याने ५ वर्षीय आर्यनचा मृत्यू !

सीएसएमटीजवळच्या भाटिया सर्कलजवळ हा अपघात घडला. दुकाचीस्वाराने धडक दिल्याने या व्यवस्कर व्यक्तीचा तोल गेला आणि ती जमिनीवर पडली. यानंतर बाजूने जाणाऱ्या बसचं मागील चाक या व्यक्तीच्या अंगावरुन गेलं. गंभीर जखमी झाल्यानंतर काही क्षणांमध्ये या व्यक्तीने दुर्घटना झाली त्याच ठिकाणी प्राण सोडले. या प्रकरणामध्ये आता पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने बाईकस्वाराचा शोध घेत आहेत. (Accident News)

हेही वाचा-Ajit Pawar: अजित पवारांनी ट्विट करत शरद पवारांना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; म्हणाले …

हुसैनियार यांचा मृतदेह सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये नेण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये बसचालक ज्ञानदेव जगदाळे यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. ज्ञानदेव यांनी पोलिसांकडे जबाब नोंदवताना, मयत व्यक्ती चालक असताना तिला बाईकने धडक दिल्याने ती जमीनीवर पडली. त्यानंतरच हा गंभीर अपघात झाल्याचं बस चालकाने सांगितलं आहे. सदर बेस्टची बस अणुशक्ती नगर ते कुलाबा या मार्गावर धावत होती. या प्रकरणात मुख्य आरोपी हा अज्ञात बाईकस्वारच आहे. (Accident News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.