Accident News: नोकरीच्या शोधात निघालेल्या मजुरांच्या वाहनाची टँकरला धडक! ८ जणांचा मृत्यू

110
Accident News: नोकरीच्या शोधात निघालेल्या मजुरांच्या वाहनाची टँकरला धडक! ८ जणांचा मृत्यू
Accident News: नोकरीच्या शोधात निघालेल्या मजुरांच्या वाहनाची टँकरला धडक! ८ जणांचा मृत्यू

सिरोही पिंडवाडा उदयपूर राष्ट्रीय महामार्ग-२७ वरील कंताल पुलाजवळ भीषण अपघात (Accident News) झाला आहे. मजुरांनी भरलेली एक जीप टँकरला जाऊन धडकली. या अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे, तर २३ जण जखमी असल्याची माहिती आहे. अपघात इतका भीषण होता की जीप पूर्णपणे चक्काचूर झाली आहे. या जीपमधून प्रवास करणारे प्रवासी हे उदयपूरहून पालीच्या दिशेने जात होते. त्यावेळी समोरून येणाऱ्या टँकरची आणि या जीपची जोरदार धडक झाली.

(हेही वाचा-Kolkata Crime: कोलकाता रुग्णालयात आजारी मुलाच्या आईचा विनयभंग! वॉर्डबॉयला अटक)

स्थानिकांनी तात्काळ धाव घेतली आणि जीपच्या दाराच्या काचा फोडून त्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील खासदार, आमदार, जिल्हाधिकारी, एसपी आणि इतर अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले. सिरोहीच्या जिल्हाधिकारी अल्पा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात जखमी झालेल्यांपैकी २ जणांना उदयपूरला रेफर करण्यात आले आहे. असे अपघात घडू नयेत, यातील त्रुटी दूर करून भविष्यात असे अपघात होऊ नयेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. (Accident News)

(हेही वाचा-Bandra Worli Sea-Link वर BMW व Mercedes ची शर्यत! भीषण अपघातात टॅक्सी उलटली)

पिंडवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी हमीर सिंह भाटी यांनी याबाबत दिलेल्या माहितीनुसार, जीपमध्ये प्रवास करणारे लोक उदयपूरच्या गोगुंडा तहसीलमधील ओगाना गावचे रहिवासी आहेत. सर्वजण कामासाठी पाली येथे जात होते. दरम्यान, पिंडवाडा-उदयपूर फोरलेन हायवेवर जीप आणि टँकरची धडक झाली. याची माहिती मिळताच आम्ही पोलीस पथकासह अपघातस्थळी पोहोचलो. जीप राँग साइडने जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी समोरून येणाऱ्या टँकरची आणि जीपची जोरदार धडक झाली. (Accident News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.