Accident News : वाहनांची सामोरासमोर धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू, नऊ जण जखमी

38
Accident News : वाहनांची सामोरासमोर धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू, नऊ जण जखमी
Accident News : वाहनांची सामोरासमोर धडक बसून दोन ऊसतोड मजुरांचा मृत्यू, नऊ जण जखमी

सांगोल्याजवळ (Sangola) मालवाहतूक करणाऱ्या दोन वाहनांची सामोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात (Accident News) दोन ऊसतोड मजुरांचा (sugarcane workers ) मृत्यू झाला आहे. तर अन्य नऊ जण जखमी झाले. फिक्कट गाडीतून डाळिंबाची वाहतूक (Pomegranate transportation) केली जात होती. तर टेम्पोत ऊसतोड मजूर होते. सर्व मृत आणि जखमी सांगोला तालुक्यातील गौडवाडीतील राहणारे आहेत. (Accident News)

मृतांची व जखमींची नावे
बाबुराव महादेव गोडसे (वय ४२) आणि एकनाथ सोपान गडदे (वय ५३) अशी या अपघातातील मृतांची नावे आहेत. जखमी मध्ये विमल भारत कांबळे (वय ५५), रेश्मा संजय ऐवळे (वय ३०), सुजाता बापू आलदर (वय ३५), दामू राजाराम शिंगाडे (वय ६०), गोरख लिंगू सरगर, मोईनुद्दीन गुलाब मुलाणी (वय ७०) गणपत दत्तू आलदर (वय ५०), भारत विष्णू कांबळे (वय ६५) आणि हर्षद हणमंतु काटे (वय १८) यांचा समावेश आहे. (Accident News)

नेमकं काय घडलं ?
सांगोला तालुक्यातील कडलास येथील शेतकऱ्यांचा ऊस तोड करून (१० के ६७५३) या टेम्पोमधून मिरज रस्त्यावर गौडवाडीकडे आपल्या गावी परत निघाले होते. तर एखतपूर येथून डाळिंब भरून एमएच ४५ एएफ ६७८५) पिकअप गाडी सांगोल्याच्या दिशेने निघाली होती. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. सांगोला पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. (Accident News)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.