कणकवली (Kankavali) तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) नांदगाव-ओटव फाटा येथील पुलावर पुणे ते ओरोस पर्यंत विद्यार्थ्यांची सहल घेऊन येणाऱ्या एसटी बसचा अपघात (Accident News) झाला. पुलावरील रस्ता दुभाजकाच्या संरक्षक कठड्याला आदळून हा अपघात झाला आहे. ही घटना काल, मंगळवारी (3 डिसेंबर) मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास घडली आहे. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही जीवितहानी झाली नाही. काही विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत वगळता मोठी इजा नसल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे. (Accident News)
हेही वाचा- double decker bus mumbai : मुंबईत डबल डेकर बसचे भाडे किती आहे?
सर्वजण मंगळवारी मध्यरात्री गाढ झोपेत असताना 2 वाजता या अपघाताचा मोठा आवाज आला. महामार्गालगत बाजूला असलेल्या नांदगाव पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांना या अपघाताचा आवाज आला. त्यांनी तातडीने मदत मिळण्यासाठी बाजूलाच असलेले सामाजिक कार्यकर्ते भूपेश मोरजकर यांना संपर्क साधून याबाबत माहिती दिली. त्यांनतर लगेचच पोलीस पाटील वृषाली मोरजकर, भुपेश मोरजकर, केदार खोत , प्रभाकर म्हसकर, दीक्षा मोरजकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आणि घाबरलेल्या मुलांना धीर दिला. (Accident News)
जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले. सुदैवाने या अपघातामध्ये कोणत्याही जीवितहानी झाली नाही मात्र एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .या घटनेची माहिती वृषाली मोरजकर यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली. त्यानंतर तत्काळ कणकवली पोलिस ठाण्याचे हवालदार चंद्रकांत झोरे, माने, प्रणाली जाधव हे घटनास्थळी दाखल झाले. तसेच घटनेचा पंचनामा केला. अधिक तपास सुरु आहे. (Accident News)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community