Accident : मुंबईत अपघाताची मालिका सुरूच; मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकरसह तीन जखमी; एका कामगाराचा मृत्यू

166
Accident : मुंबईत अपघाताची मालिका सुरूच; मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकरसह तीन जखमी; एका कामगाराचा मृत्यू
  • प्रतिनिधी 

मुंबई उपनगरात अपघातांची (Accident) मालिका सुरूच असून कुर्ला, घाटकोपर पाठोपाठ कांदिवली पूर्व पोईसर मेट्रो स्थानक येथे शुक्रवारी मध्यरात्री भरधाव कारने मेट्रोच्या कामगारांना धडक दिली. या भीषण अपघातात एका मेट्रो कामगाराचा मृत्यू झाला. मराठी अभिनेत्री उर्मिला कानेटकर सह तीन जण जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या उर्मिला कानेटकर या ज्येष्ठ मराठी अभिनेते महेश कोठारे यांचे पुत्र आदिनाथ कोठारे यांच्या पत्नी आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून समता नगर पोलिसांनी अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा – Delhi Assembly Election च्या प्रचाराचा पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार श्रीगणेशा)

कांदिवली पूर्व पश्चिम द्रुतगती महामार्ग येथील पोईसर मेट्रो स्थानकाजवळ शुक्रवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास बोरिवलीच्या दिशेने भरधाव वेगात निघालेल्या हुंदाई ही कार क्रमांक एम एच ४७-एजी-७६५७ या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट पोईसर मेट्रो स्थानकाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी धडकली. या भीषण अपघात (Accident) मेट्रो साईडवर काम करणाऱ्या दोन कामगारांसह कार चालक आणि अभिनेत्री उर्मिला कानेटकर असे चौघे जण जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच समता नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, जखमींपैकी एका कामगारांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जखमींपैकी अभिनेत्री उर्मिला कानेटकर आणि त्यांच्या कार चालकाला कांदिवलीतील नम: या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

(हेही वाचा – Baba Siddique Murder : लवकरच २६ आरोपींविरुद्ध दाखल होणार आरोपपत्र)

समता नगर पोलिसांनी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभिनेत्री उर्मिला कानेटकर यांच्या कारवरील चालकाची वैद्यकीय चाचणी करण्यात आली होती. अद्याप वैद्यकीय चाचणीच्या अहवाला प्राप्त झालेला नसून त्याने नशा केली होती का हे अहवालानंतर उघडकीस येईल असे पोलिसांनी सांगितले. या अपघातात (Accident) जखमी झालेल्या अभिनेत्री उर्मिला कानेटकर ज्येष्ठ मराठी अभिनेते महेश कोठारे यांचे पुत्र आदिनाथ कोठारे यांच्या पत्नी आहेत.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.