Police : लॉकअपमध्ये आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

अरबाज इस्माईल शेख (१९) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

217
suicide
suicide
कांजूरमार्ग पोलीस ठाण्यातील कोठडीत (lockup) मध्ये एका आरोपीने गळफास लावून आत्महत्या (suicide)  करण्याचा प्रयत्न केला, कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस अंमलदाराचे लक्ष गेल्यामुळे आरोपीचे (accuse) प्राण वाचले असून त्याला उपचारासाठी फोर्टीस (fortis) या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कांजूरमार्ग पोलिसांनी या प्रकरणी आरोपी विरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
अरबाज इस्माईल शेख (१९) (arbaaz shaikh) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. अरबाज हा राशिद कंपाउंड, मुंब्रा जि. ठाणे येथे राहणारा आहे. अरबाज याला कांजूरमार्ग पोलीस ठाण्याने अमली पदार्थासह अटक केली होती, त्याच्याकडे गांजा (Cannabis) हा अमली पदार्थ मिळून आला होता, याप्रकरणी कांजूरमार्ग पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली होती. गुरुवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या कोठडीत (police Lockup) ठेवण्यात आलेला अरबाज हा कोठडीत अस्वस्थपणे येरझाऱ्या मारत होता, त्याने कोठडीवरील कर्तव्यावर असलेल्या पोलीस अंमलदार यांच्याकडे तंबाखू मागितली. परंतु त्याला पोलीस अंमलदार यांनी तंबाखू देण्यास मनाई केली.
काही वेळाने पोलिस कोठडीतून विचित्र आवाज येत असल्याने अंमलदार यांनी कोठडीकडे धाव घेतली असता अरबाजने कोठडीत खिळ्याला अडकवलेल्या टेलिफोन वायरला गळफास लावून घेतला होता. पोलिसांनी तातडीने त्याच्या गळ्यातील वायर काढून त्याला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात आणले, मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याचे बघून तेथील डॉक्टरांनी त्याला फोर्टीस रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. कांजूरमार्ग पोलिसांनी तात्काळ त्याला फोर्टीस रुग्णालयात दाखल केले, तेथील डॉक्टरांनी त्याला दाखल करून त्याच्यावर उपचार सुरू केले आहे. अरबाज हा शुद्धीवर येताच कांजूरमार्ग पोलिसांचा जीव भांड्यात पडला. याप्रकरणी आरोपी विरुद्ध आत्महत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.