९२ च्या दंगलीतील आरोपीला १८ वर्षांनी अटक

132

मुंबईत उसळलेल्या १९९२च्या दंगलीतील फरार आरोपीला अठरा वर्षांनी पोलिसांनी मालाड येथून अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या आरोपीचे नाव तरबेज अजीम खान उर्फ मन्सूरी (४७)असे आहे.

( हेही वाचा : १५ डिसेंबरपासून समृद्धी महामार्गावर धावणार ‘लालपरी’! ‘या’ नागरिकांना मिळणार ५० टक्के सवलत; जाणून तिकीट दर…)

१९९२ साली मुंबईतील विविध ठिकाणी उसळलेल्या दंगली पैकी पश्चिम उपनगरातील मालाड येथे दंगलीच्या घटनेत ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात सत्र न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते, न्यायालयाने या खटल्यात २आरोपीची निर्दोष मुक्तता केली होती, तर एकाचा खटल्या दरम्यान मृत्यु झाला होता. उर्वरित सहा जण सुनावणीसाठी न्यायालयात हजर झाले नव्हते. २००४ मध्ये न्यायालयाने मन्सूरीसह सहा आरोपींना फरार घोषित केले होते.

मन्सुरी हा गेल्या १८ वर्षांपासून मालाड येथे आपली ओळख बदलून राहत होता, व इस्टेट एजंट म्हणून काम करीत होता, ही माहिती दिंडोशी पोलिसांना मिळताच पोलिसांनी मन्सूरी याला मालाड परिसरातून अटक केली आहे. त्याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.