मुलुंडमधील Hit And Run प्रकरणातील आरोपीला खारघरमधून अटक

240
मुलुंड पूर्व गव्हाणपाडा येथील ‘हिट अँड रन’च्या (Hit And Run) घटनेतील पळून गेलेल्या आरोपीला नवी मुंबईतून अटक करण्यात आली आहे. शक्ती अलग असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे, मुलुंड पश्चिम मुलुंड वसाहत येथे राहणारा शक्ती हा कॉल सेंटरमध्ये कामाला होता, त्याचे वडील रिक्षा चालक आहे. नवघर पोलिसांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
मुलुंड पूर्व येथील गव्हाणपाडा येथील सार्वजनिक गणेश मंडळाचे दोन कार्यकर्ते शनिवारी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावर मंडळाचे बॅनर लावण्यासाठी शिडीवर चढले होते, दरम्यान एक बीएमडब्ल्यू कार भरधाव वेगाने मुलुंड पश्चिमेला जात असताना कारने शिडीला धडक दिली, या भीषण अपघात (Hit And Run) प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे दोघे गंभीर जखमी झाले, मंडळाच्या इतर कार्यकर्त्यांनी जखमी कार्यकर्त्यांना नजीकच्या रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी प्रीतम थोरात या कार्यकर्त्याला मृत घोषित केले असून प्रसाद पाटीलला उपचारासाठी अतिदक्षता विभागात  दाखल करण्यात आले आहे.
नवघर पोलिसांनी या प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पळून गेलेल्या आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे वेगवेगळे पथके तयार करण्यात आली होती, पोलिसांनी बीएमडब्ल्यू ही अपघातग्रस्त कार मुलुंड वसाहत येथून ताब्यात घेण्यात आली. दरम्यान आरोपीला नवी मुंबईतील खारघर येथून मित्राच्या घरातून अटक करण्यात आली आहे. आरोपीचे रक्ताचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवले आहेत.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.