Mumbai Local: लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ४ वर्षांनी मिळाली शिक्षा

234
Mumbai Local: लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ४ वर्षांनी मिळाली शिक्षा
Mumbai Local: लोकलमध्ये महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला ४ वर्षांनी मिळाली शिक्षा

मुंबईतील लोकलमध्ये (Mumbai Local) २०१९ मध्ये एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने ४९ वर्षीय पुरुषाला एक दिवसाची शिक्षा सुनावली आहे.

न्यायालयाने आरोपीला न्यायालयाचे दिवसभराचे कामकाज पूर्ण होईपर्यंत शिक्षा भोगण्याचे निर्देश देऊन त्याला १००० रुपयांचा दंड ठोठावला. या प्रकरणी आरोपीने त्याला या प्रकरणात गोवण्यात आल्याचा दावा केला होता, मात्र आरोपीचा हा दावा न्यायालयाने मान्य करण्यास नकार दिला तसेच महिलेचे त्याच्याशी पूर्वीपासून कोणतेही वैयक्तिक वैर नसल्याच्या आरोपीच्या दाव्याचे न्यायालयाने खंडन केले आहे.

(हेही वाचा – Middle Vaitarna Dam : मध्य वैतरणा प्रकल्प : कंत्राटदाराला व्याजासह द्यावे लागले सुमारे ३० कोटी रुपये)

या प्रकरणी मिळालेली अधिक माहिती अशी की, १३ ऑगस्ट २०१९ रोजी पीडिता पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करत असताना आरोपींनी तिचा वारंवार विनयभंग केला. त्यानंतर महिला आणि तिच्या भावाने आरोपीला शिवीगाळ करत त्याला पकडून वांद्रे रेल्वे पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी महिलेने केलेल्या तक्रारीनुसार, आरोपीवर गुन्हा दाखल केला. तक्रारदार महिला आणि इतर साक्षीदारांच्या पुराव्यावरून आरोपीवरील आरोप उघडकीस आल्याची माहिती न्यायालयाकडून देण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.