Mumbai Crimes News : एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

142
Mumbai Crimes News : एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या
Mumbai Crimes News : एअर होस्टेस हत्या प्रकरणातील आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या

मुंबईत एअर होस्टेसची हत्या करणाऱ्या आरोपीने अंधेरीमधील पोलीस स्टेशनच्या लॉक-अपमध्ये आत्महत्या केली आहे. आरोपी विक्रम अटवाल याने पँटने गळफास लावून घेतल्याची घटना आज सकाळी 6.30 च्या सुमारास घडली. पवई इथे राहणाऱ्या रुपल आग्रे (23) या एअर होस्टेसच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी विक्रमला अटक करण्यात आली होती. तो पोलीस कोठडीत होता. तिथेच त्याने गळफास घेऊन आपलं आयु्ष्य संपवलं.

अंधेरी पूर्व येथील एन.जी.कॉम्प्लेक्स येथे भाडेतत्त्वावर राहणाऱ्या हवाई सुंदरी रुपल आग्रे या तरुणीची हत्या प्रकरणी ४ सप्टेंबर रोजी विक्रम अटवाल (35) याला पवई पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सफाई कर्मचारी आरोपी विक्रम अटवाल याने गुरुवारी सकाळी अंधेरी लॉकअपमधील टॉयलेटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी त्याला अंधेरी न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.अंधेरी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेल्या जनरल लॉकअपमध्ये त्याला ठेवण्यात आले होते. तीन दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर शुक्रवारी विक्रम अठवाल याला न्यायालयात हजर करण्यात येणार होते; परंतु सकाळीच त्याने लॉकअपमधील टॉयलेटमध्ये पॅन्टच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.

(हेही वाचा – Laxmidhar Behra : लोकांनी मांस खाल्ल्याने हिमाचलमध्ये भूस्खलन; IITच्या संचालकांचे अजब विधान )

अंधेरी लॉकअपमधील टॉयलेटमध्ये गेलेला आरोपी विक्रमला बराच वेळ होऊन बाहेर येत नसल्याचे बघून लॉकअप ड्युटीवरील पोलीस शिपायाने त्याला आवाज दिला,मात्र आतून कुठलाही प्रतिसाद येत नसल्यामुळे ड्युटीवरील पोलिसाला संशय आल्याने त्यांनी पोलीस कोठडीत जाऊन बघितले. तेव्हा शौचालयाचा दरवाजा तुटलेला होता आणि त्यात अटवाल शौचालयात पाण्याच्या पाईपला लटकलेला आढळला.त्याने स्वतःच्या कपड्याचा वापर करून स्वतःला फाशी घेतली,” असे पवई पोलिसांनी सांगितले.

विक्रम अटवाल हा पवईतील तुंगा व्हिलेज येथे कुटुंबासह राहात होता. अटवालच्या आत्महत्येप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.