दिल्ली विद्यापीठाचा माजी प्राध्यापक आणि नक्षल समर्थक जीएन साईबाबा आणि इतर 5 जणांची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठान निर्दोष मुक्तता केलीय. याप्रकरणी सप्टेंबर 2023 मध्ये सुनावणी पूर्ण झाली होती; परंतु कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यानुसार, मंगळवारी न्यायमूर्ती विनय जोशी आणि न्यायमूर्ती वाल्मिकी मेनेझेस यांच्या खंडपीठाने सर्व आरोपींची (Crimes) निर्दोष मुक्तता केलीय.
गडचिरोली सत्र न्यायालयाने मार्च 2017 मध्ये जी. एन. साईबाबा व इतर आरोपांना नक्षलवादी कारवायांशी संबंध असल्याच्या व त्यातून देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवले होते. साईबाबा व इतर 2 आरोपांकडे भूमिगत नक्षलवाद्यांना वितरीत करण्यासाठीचे साहित्य सापडल्याचे न्यायालयाने मान्य केले होते तसेच यातून लोकांना हिंसक कारवायांसाठी भडकवण्याचा हेतू असल्याचे देखील सत्र न्यायालयाने मान्य करत आरोपींना शिक्षा ठोठावली होती.
(हेही वाचा – Revanth Reddy : पंतप्रधान मोदी मला मोठ्या भावासारखे ; काँग्रेसच्या मुख्यमंत्रीकडून मोदींचे कौतुक )
याविरोधात जीएन साईबाबा याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती रोहित देव यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. हायकोर्टाने 14 ऑक्टोबर 2022 रोजी या आरोपींची निर्दोष सुटकाही केली, मात्र महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा निकाल रद्द ठरवत पुन्हा सुनावणीचे आदेश दिले. त्यानंतर आता दुसऱ्यांदा जी. एन. साईबाबा निर्दोष असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने (mumbai high court) दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community