भारतातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी घुसखोर बांगलादेशी नागरिकाकडून बनावट पासपोर्ट आणि व्हिसाच्या (Bangladeshi fake passports and visas) वापर करण्यात येत असल्याचे विमानतळावर मागील काही आठवड्यापासून सुरू असलेल्या कारवाईतून समोर आले आहे. गेल्या आठवड्यात मुंबईतील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याने केलेल्या कारवाईत ६ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक केली होती. अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिकापैकी काही जण २५ ते ३० वर्षांपासून बनावट कागदपत्रे तयार करून राहत होते. तर त्यातील अनेकांनी राज्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये बेकायदेशीर मतदान केल्याचे देखील समोर आले आहे.
पोलिसांच्या या कारवामुळे घुसखोर बांगलादेशी नागरिकांचे धाबे दणाणले असून या बांगलादेशी नागरिकानी पोलिसांच्या या कारवाईला घाबरून भारतातून दुसऱ्या देशात पळून जाण्यासाठी बोगस कागदपत्राचा आधार घेत आहेत. बनावट पासपोर्ट आणि व्हिसाच्या आधारे दुसऱ्या देशात पळून जाण्याच्या प्रयत्नांत असणाऱ्या जवळपास १० ते १२ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) अटक करण्यात आली आहे. या घुसखोर बांगलादेशी नागरिकांवर मुंबईतील सहार पोलीस ठाण्यात बनावट कागदपत्रे, बनावट पासपोर्ट प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विमानतळावर इमिग्रेशनला असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही आठवड्यापासून घुसखोर बांगलादेशी विरुद्ध कारवाई सुरू असून प्रत्येक संशयितांची कसून चौकशी करून त्यांचे कागदपत्रे तपासली जात आहे. संशयित आढळुन येणाऱ्याविरुद्ध कारवाई करून त्यांना सहार पोलीसाकडे सोपवून त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येत आहे.
(हेही वाचा – कल्याणमधील अत्याचाराच्या घटनेनंतर उपसभापती Neelam Gorhe यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना लिहिले पत्र; म्हणाल्या…)
दरम्यान राज्य एटीएसच्या पथकाने भारतात घुसखोरी करून बेकायदेशीर राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली असून मागील काही दिवसापासून सुरू असलेल्या कारवाईत एटीएसने मुंबई, ठाणे,नवी मुंबई आणि नाशिक जिल्ह्यातुन १७ घुसखोर बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या १७ बांगलादेशी नागरिकांमध्ये जणांमध्ये १४ पुरुष आणि ३ महिलाचा समावेश आहे. एटीएसने अटक करण्यात आलेल्या घुसखोर बांगलादेशी नागरिकाविरुद्ध वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात १० गुन्हे दाखल केले आहे. पुढील तपासासाठी अटक बांगलादेशी नागरिकांना स्थानिक पोलिस ठाण्यांकडे सोपवण्यात आले आहे. एटीएसकडून मिळालेल्या माहितीनुसार, बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्डच्या आधारे गेली अनेक वर्षांपासून बांगलादेशी नागरिक घुसखोरी करून राहत होते. स्थानिक पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
हेही पाहा –