आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया बनमीत नरुलाच्या हल्दवानीच्या घरातून ईडीने २६८ बिटकॉइन्स जप्त केले आहेत. भारतीय रुपयांमध्ये त्यांची किंमत सुमारे १३० कोटी रुपये आहे.
ईडीच्या म्हणण्यानुसार, बनमीत आणि त्याच्या भावाने याचा वापर डार्क वेबद्वारे ड्रग्ज खरेदी-विक्री करण्यासाठी केला होता. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)ने नुकतेच सांगितले की, त्यांनी १३० कोटी रुपयांहून अधिक किमतीची क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे आणि अमेरिकन अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून सुरू केलेल्या चौकशीदरम्यान ड्रग्जच्या तस्करीशी संबंधित मनी लॉन्ड्रींगच्या चौकशीचा भाग म्हणून उत्तराखंडमधील एका व्यक्तिला अटक केली आहे.
(हेही वाचा – Ashok Chakra : भारताच्या झेंड्यामध्ये अशोक चक्राचा समावेश का करण्यात आला? काय आहे अर्थ आणि हेतू?)
केंद्रीय तपास यंत्रणेने सांगितले की, आरोपी डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकायचे. बहुतेक युरोपियन देशांमध्ये त्यांचे ग्राहक असायचे. अमेरिकन अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. परिसराची झडती घेतल्यानंतर आरोपींना २७ एप्रिलला नैनितालमधील हल्द्वानी येथून ताब्यात घेण्यात आलं होतं. परविंदर सिंग आणि त्याचा भाऊ बनमीत सिंग आणि त्याच्या काही साथीदारांनी क्रिप्टोकरन्सी व्यवहाराद्वारे डार्क वेब मार्केटमध्ये विकून पैसे उभे केले. त्यासाठी त्यांनी सिल्क रोड १, अल्फा बे आणि हंसासारख्या डार्क वेब मार्केटसवर लिस्टन नावाचा वापर केला होता.
हेही पहा –