Malvan मध्ये राष्ट्राविरोधी घोषणा देणाऱ्या धर्मांध मुसलमानांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई

209

Malvan : विराट कोहलीच्या दमदार शतकी खेळीने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये (Champions Trophy) भारताने रविवार 23 फेब्रुवारीला पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरु असताना मालवण शहरात आडवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यवसायिकाकडून (Scrap dealer) भारत विरोधी घोषणा (Malvan Anti-India slogans) दिल्याचा प्रकार घडला. याबाबत माहिती मिळताच नागरिकांनी संबंधितांना विचारणा केली असता त्या संबंधितांकडून अरेरावी करण्यात आली. या घटनेची तात्काळ दखल घेत आमदार निलेश राणे (MLA Nilesh Rane) यांनी परप्रांतीय भंगारवाल्यांच्या वस्तीमधील अनधिकृत बांधकाम हटविण्याचे पत्र मालवण नगरपालिका प्रशासनाला दिले. (Malvan)

(हेही वाचा – China Radar System : भारतासाठी धोक्याची घंटा; चीनने म्यानमार सीमेजवळ उभारली रडार प्रणाली)

मिळालेल्या माहितीनुसार, संतप्त नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तसेच या प्रकरणी पोलिसांनी एका कुटुंबातील तिघांना ताब्यात घेतले आहे. चौकशी अंती एकाला अटक करण्यात आली आहे. एक जण अल्पवयीन असल्याने त्या कायद्यानुसार कार्यवाही सुरु आहे. तर एका महिलेचीही चौकशी सुरु असल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे (Malvan Police Inspector Praveen Kolhe) यांनी दिली आहे.

तसेच यावर नगरपालिका प्रशासनाने या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत बुलडोझर फिरवण्यात आला. सदरचे बांधकाम जमीनदोस्त केले. या प्रसंगी उपस्‍थित देशप्रेमींकडून भारत माता की जय…च्या घोषणा देण्यात आल्या.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.