या वर्षाच्या सुरुवातीला कोस्टल रोडवरील बोगद्याच्या भिंतीवर एक कार आदळल्यानंतर दोन चालकांचे परवाने निलंबित करण्यात आले होते आणि वाहने जप्त करण्यात आली होती. या घटनेमुळे वाहतूक कोंडी झाली होती आणि बेकायदेशीर रेसिंग आणि हॉर्न आणि मोठ्या आवाजातील एक्झॉस्ट पाईप्समुळे होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती.गेल्या आठवड्यात राज्य परिवहन विभागाच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर ही कारवाई सुरू झाली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. “मरीन ड्राइव्ह ते वरळी दरम्यानच्या १० किमी लांबीच्या कोस्टल रोडवर ताडदेव आणि वडाळा आरटीओचे फ्लाइंग स्क्वॉड तैनात आहेत. आतापर्यंत, त्यांनी कोस्टल रोडवर परवानगी असलेल्या वेगमर्यादा ओलांडल्या बद्दल ५९६ वाहनांना ई-चलान जारी केले आहेत,” असे राज्य परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.ताडदेव आरटीओने ३०६ ई-चलान जारी केले, तर पूर्व उपनगरांची जबाबदारी असलेल्या वडाळा आरटीओने उर्वरित २९० ई-चलान जारी केले.
(हेही वाचा – ‘छावा’ चित्रपटामुळे Swara Bhaskar चा तिळपापड; म्हणते, 500 वर्षांपूर्वीचा सीन पाहून भावूक होणारा समाज मनाने आणि आत्म्याने मेलाय)
एका आरटीओ अधिकाऱ्याने सांगितले की, अतीवेगाने वाहन चालवणारे बहुतेक मर्सिडीज, ऑडी आणि बीएमडब्ल्यू सारख्या महागड्या वाहनाचे मालकांना ई चलन देण्यात आली आहे. मोटार वाहन कायद्यानुसार, वेगाने गाडी चालवणे हा एक गुन्हा आहे ज्यामध्ये दंड आकारला जाऊ शकतो. दंडाची रक्कमऑनलाइन देखील भरता येतो.मरीन ड्राइव्ह ते वरळी पर्यंत पसरलेला १० किमीचा हा किनारी रस्ता १२ मार्च २०२४ पासून टप्प्याटप्प्याने खुला करण्यात आला आहे. ५० लाखांहून अधिक वाहनांनी आधीच त्याचा वापर केला आहे, दररोज सरासरी १८,०००-२०,००० वाहने प्रवास करतात.
हेही पाहा –