अभिनेत्री जिया खान आत्महत्या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने सूरज पांचोली याची निर्दोष मुक्तता केली. तब्बल १० वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला आहे. जिया खान हिचा मृतदेह ३ जून २०१३ रोजी तिच्या मुंबईतील घरी सापडला होता. गेल्या आठवड्यात सीबीआयचे विशेष न्यायाधीश एएस सय्यद यांनी दोन्ही बाजूंचा अंतिम युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता.
अभिनेता आदित्य पांचोली आणि जरीना वहाब यांचा मुलगा सूरज पांचोली याच्यावर जिया खानला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप होता. जियाने सूरज पांचोली विरोधात लिहिलेल्या ६ पानी पत्राच्या आधारे सीबीआयने न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
(हेही वाचा – Nitesh Rane: संजय राऊत राजकारणातला लावारीस आहे का?, नितेश राणेंचा सवाल)
सीबीआयच्या म्हणण्यानुसार, १० जून २०१३ रोजी तपास सुरू करणाऱ्या मुंबई पोलिसांनी जप्त केलेले पत्र जिया खानने लिहिले होते. सीबीआयने असा दावा केला आहे की, या पत्रात “सूरज पांचोलीशी जवळचे संबंध, शारीरिक शोषण, मानसिक आणि शारीरिक छळ” याबद्दल लिहिलेले आहे. ज्यामुळे तिने आत्महत्या केली. सीबीआयच्या आरोपपत्रात दाखल केलेल्या या पत्रात अभिनेत्रीने पांचोलीवर अत्याचार, फसवणूक आणि खोटे बोलणे यासह अनेक गंभीर आरोप केले आहेत. या पत्राने प्रकरणाला नवे वळण आले होते आता या प्रकरणात न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community