Actress Raveena Tandon Case : रवीना टंडन नशेत नव्हती; व्हायरल व्हिडीओतील दावा खोटा

242
Actress Raveena Tandon Case : रवीना टंडन नशेत नव्हती; व्हायरल व्हिडीओतील दावा खोटा

अभिनेत्री रवीना टंडन आणि वांद्रयातील एका कुटुंबाच्या भांडणाचा व्हिडीओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला, या व्हिडीओत कुटुंबाने रवीना टंडन आणि तिच्या वाहन चालकाने मारहाण केल्याचा तसेच दोघे मद्यधुंद अवस्थेत असल्याचा आरोप केला होता. रवीना टंडन नशेत नव्हती आणि तिच्या ड्रायव्हरची चूक नव्हती असे तपासात समोर आले असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. (Actress Raveena Tandon Case)

अभिनेत्री रवीना टंडनच्या वाहन चालकाने शनिवारी रात्री उशिरा खारच्या कार्टर रोड येथील एका इमारतीच्या आवारात एका महिलेला धडक दिल्याच्या संशयावरून या महिलेच्या कुटुंबियांनी आणि तेथील स्थानिक जमावाने घेराव घातला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, एक महिला तक्रार करताना दिसत आहे की टंडन आणि तिच्या ड्रायव्हरने तिच्यावर हल्ला केला आणि तिच्या नाकातून रक्तस्त्राव झाला, या व्हिडिओत टंडन ही वाहन चालकाचा बचाव करताना आणि त्याला मारू नका म्हणून जमावाला विनंती करताना दिसत आहे. दरम्यान त्या कुटुंबातील मोहम्मद शेख याने व्हिडीओ मध्ये टंडन आणि वाहन चालकांवर दारुच्या नशेत असल्याचा आरोप केला आहे, तसेच पोलिसांनी आमची तक्रार लिहून घेतली नसल्याचा आरोप शेख याने व्हिडीओ मध्ये केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टंडनचा ड्रायव्हर गाडी रिव्हर्स घेत असताना ही घटना घडली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, ड्रायव्हर मोटार पार्क करत होता, तेव्हा महिला आणि तिच्या कुटुंबीयांनी आरोप केला की मोटारीने त्यांना धडक दिली, या धडकेत जखमी झाल्याचा दावा महिलेने केला. (Actress Raveena Tandon Case)

(हेही वाचा – T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिजमध्ये उद्घाटनाच्या सामन्याला रिकाम्या खुर्च्या)

अशाप्रकारे प्रकरण आले समोर 

“जेव्हा आम्ही त्यांना अडवले तेव्हा ड्रायव्हरने माझी भाची आणि माझ्या आईला मारहाण केली. रवीना टंडन, स्वत:, जी मद्यधुंद अवस्थेत होती, ती देखील बाहेर पडली आणि (माझी आई आणि भाची) क्रूरपणे मारहाण केली. आम्ही चार तासांपासून खार पोलिस स्टेशनमध्ये आहोत आणि कोणीही तक्रार नोंदवत नाही,” असा आरोप मोहम्मद शेख याने केला. पोलिस उपायुक्त राज टिळक रौशन म्हणाले, “टंडनचा ड्रायव्हर वाहन पार्क करत असताना वाद सुरू झाला हे प्रकरण आता मिटले आहे. (Actress Raveena Tandon Case)

दोन्ही पक्षांनी आम्हाला लेखी कळवले आहे की ते एकमेकांविरुद्ध कोणतीही तक्रार करू इच्छित नाहीत.” एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “अभिनेत्रीचा ड्रायव्हर मोटार रिव्हर्स घेत असताना रस्त्याने चालत असलेल्या कुटुंबातील चार सदस्यांनी चालकाला थांबवले.” अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, टंडन नशेत नव्हती आणि तिच्या ड्रायव्हरची चूक नव्हती. “तक्रारदाराने कथित व्हिडीओमध्ये खोटी तक्रार दिली आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले. तक्रारदार आणि अभिनेत्री दोघांनीही आम्हाला कोणतीही तक्रार नोंदवायची नसल्याचे पत्र दिले,” अधिकारी पुढे म्हणाले. व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर तो व्हायरल करण्याऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्याचा विचार पोलीस करत आहेत. (Actress Raveena Tandon Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.