राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या आणि बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळी देशभरात चर्चेत आली आहे. या टोळीच्या नावाने दररोज खंडणीचे फोन येत आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. बाबा सिद्दीकी खून प्रकरणाच्या (Baba Siddiqui murder case) तपासादरम्यान पोलिसांना कळले की दिल्लीतील श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्याकांडातील आरोपी आफताब पूनावाला हा लॉरेन्स गँगच्या निशाण्यावर आहे. (Lawrence Bishnoi)
श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर आफताब पूनावाला दिल्लीच्या तिहार तुरुंगात जेरबंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिहार तुरुंगात लॉरेन्स गँगचे लोक त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी शिवकुमार गौतम याने हा खुलासा केला आहे. हा प्रकार त्याचा मित्र शुभम लोणकर यांनी आपल्याला सांगितल्याचे त्याने सांगितले. या माहितीची दखल घेत तिहार तुरुंग प्रशासन आफताबच्या सुरक्षेबाबत सतर्क झाले आहे.
(हेही वाचा – Bitcoin आणि ट्रेडिंगसाठी आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून येणाऱ्या लिंकपासून सावधान)
श्रद्धा वालकर प्रकरण नेमकं काय ?
श्रद्धा वालकर खून प्रकरण हे संपूर्ण भारताला हादरवून सोडणारे प्रकरण आहे. ही घटना मे २०२२ मध्ये उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावाला (Aftab Poonawala) याला अटक केली होती. आफताबने श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची कबुली दिली. आफताबच्या तपासादरम्यान उघडकीस आलेल्या खुलाशामुळे सर्वच आश्चर्यचकित झाले आहेत.
हेही पाहा –