मांसाहारासाठी आफताब श्रद्धावर करीत होता अत्याचार

श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात दिल्ली पोलिसांनी वसईतून १५ जणांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात एक सामाजिक कार्यकर्त्या आणि एका डॉक्टरांचा समावेश आहे. शाकाहारी असणाऱ्या श्रद्धाला आफताब बळजबरीने मांसाहार करायला लावत होता, व तिने नकार दिल्यावर तिला मारहाण करीत असल्याची धक्कादायक माहिती या तपासात समोर आली आहे, तसेच डॉक्टरांनी दिलेल्या जबाबात श्रद्धा पाठदुखीच्या आजारासाठी आपल्याकडे आली होती असे म्हटले आहे.

( हेही वाचा : SBI बॅंकेत काम करण्याची सुवर्णसंधी; मिळेल ६३००० पर्यंत पगार, असा करा अर्ज!)

श्रद्धा वालकर हिला ओळखणाऱ्या वसईतील एका सामाजिक कार्यकर्त्याने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक अशी माहिती दिली आहे. शाकाहारी असलेल्या श्रद्धाला आफताब हा मांसाहार करण्यासाठी बळजबरी करीत होता, तसेच त्याने मांसाहार करण्यासाठी अनेक वेळा श्रद्धाला मारहाण देखील केली होती अशी माहिती या सामाजिक कार्यकर्त्या महिलेने दिली, तसेच श्रद्धानेच हा प्रकार आपल्या लक्षात आणून दिला होता, याप्रकरणी आम्ही आफताबच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यासाठी गेलो होतो, परंतु आफताबच्या आई वडिलांनी तक्रार वैगेरे देऊ नका त्यापेक्षा आफताबचा नाद सोडून दे असे श्रद्धाला बजावले होते, अशी माहिती या समाजसेविकेने दिल्ली पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे.

श्रद्धा वालकर हत्याकांडप्रकरणी दिल्ली पोलिसांनी सोमवारी वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात १५ जणांचे जबाब नोंदवले. या तिघांमध्ये वसईतील एका सामाजिक कार्यकर्त्या महिलेता समावेश आहे ज्यांनी तिला नोव्हेंबर २०२० मध्ये पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास मदत केली होती. सामाजिक कार्यकर्त्या पूनम बिदलानी यांनी सांगितले की, “आफताब आणि श्रद्धा वसईतील ज्या इमारतीत राहत होते, मी त्याच ठिकाणी राहण्यास होते, श्रद्धा वालकर माझ्याकडे २३ नोव्हेंबर २०२० रोजी आली होती, तिच्या मानेवर, हातावर आणि चेहऱ्यावर अनेक जखमा होत्या. तिने मला सांगितले की आफताब पूनावाला तिला नेहमी मारहाण करीत होता, शाकाहारी असलेल्या श्रद्धाला तो मांसाहार करण्यासाठी बळजबरी करीत होता, तिने नकार दिल्यावर तो दिला बेदम मारहाण करीत असे, मी श्रद्धाला घेऊन पोलिस ठाण्यात गेले आणि तक्रार दाखल केली, दुसऱ्या दिवशी आम्ही गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला तेव्हा, आफताब आणि त्याचे आई-वडील तिला भेटायला आले आणि तिला गुन्हा दाखल करू नको म्हणून तिची समजूत घातली, पुन्हा आफताब सोबत राहू नको अशी तिला समज दिली होती. बिदलानी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात असेही म्हटले आहे की, पूनावाला यांनी यापूर्वीही अनेकदा वालकरचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला होता.

वसईतील ओझोन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. शिवप्रसाद शिंदे यांनी पोलिसांना सांगितले की, “श्रद्धा नोव्हेंबर २०२० मध्ये पाठदुखीवर उपचार घेण्यासाठी रुग्णालयात आली होती. त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर कोणत्याही जखमा नव्हत्या, पण तिच्या शरीराच्या इतर भागांवर जखमा झाल्या होत्या. या जखमा मारहाणीच्या किंवा खाली पडताना झालेल्या जखमेसारख्या दिसत होत्या. ती तीन दिवस रुग्णालयात होती.” दिल्ली पोलिसांनी या जबाबांची पडताळणी करीत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here