कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये एका महिलेची निर्घृण हत्या करून तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना दिल्लीतील श्रद्धा वालकर (Shraddha Walker) हत्याकांडाची आठवण करून देते. २६ वर्षीय मृत तरुणीचे महालक्ष्मी (Mahalakshmi murder case) असे नाव असल्याची माहिती मिळाली आहे. बेंगळुरूमधील मल्लेश्वरम येथील व्यालिकावल निवासी भागातील एका फ्लॅटमध्ये ही घटना घडली. तीन मजली घराच्या पहिल्या मजल्यावर ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून मुस्लिम व्यक्ती अश्रफने महालक्ष्मीची हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. (Love Jihad)
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बेंगळुरूच्या मल्लेश्वरम येथील व्यालिकावल पोलीस स्टेशन (Vyalikaval Police Station) परिसरात घडली आहे. मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३० हून अधिक तुकडे करून फ्रिजमध्ये ठेवले होते. व्यालिकावल आणि शेषाद्रिपुरम पोलिसांनी घटनास्थळी तपास केला आहे. तीन मजली घराच्या पहिल्या मजल्यावर ही घटना घडली. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
(हेही वाचा – भरत गोगावले यांची अखेर MSRTC च्या अध्यक्षपदावर वर्णी; पदभार स्वीकारला)
ही हत्या ४ ते ५ दिवसांपूर्वी घडली होती
अतिरिक्त पोलीस आयुक्त सतीश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर ही घटना घराच्या पहिल्या मजल्यावर घडली असून ती चार ते पाच दिवसांपूर्वी घडली असावी. मृत महिला दुसऱ्या राज्यातील असून ती कुटुंबासह बेंगळुरू येथे राहत होती. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणाची संपूर्ण माहिती दिली जाईल, असे आयुक्त सतीश कुमार यांनी सांगितले. फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मृताची ओळख पटली आहे. त्याची माहिती लवकरच दिली जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (Love Jihad)
पोलिसांनी घटनास्थळाची कसून चौकशी केली असून, यामध्ये १५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील व्हिडिओ तपासले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. हत्येपासून बेपत्ता असलेल्या महालक्ष्मीचा मोबाईल आणि हत्येत वापरलेले हत्यार याचा शोध पोलीस घेत आहेत. हत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पाच पथके तयार केली आहेत.
(हेही वाचा – Mukhyamantri mazi ladki bahin yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! सप्टेंबरच्या ‘या’ दिवशी मिळणार तिसरा हप्ता)
दिल्ली ते वसई कनेक्शन असलेल्या ‘त्या ‘घटनेची आठवण
महालक्ष्मीच्या हत्येने दिल्लीतील श्रद्धा वालकर खून प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत २०२२ मध्ये, श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने तिचा खून केला होता. यामध्ये श्रद्धाच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि अनेक दिवस घराच्या फ्रिजमध्ये ठेवले. महालक्ष्मीच्या मृतदेहाचेही तुकडे करून त्याच पद्धतीने फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते, त्यामुळे हे प्रकरण श्रद्धा वालकर प्रकरणासारखेच असल्याचे दिसून येते. (Shraddha Walker)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community