Drug Case : १६ वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तुरुंगात

वजहुल चौधरी असे १६ वर्षांनी पुन्हा अटक झालेल्या अमली पदार्थ व्यवसायिकाचे नाव आहे.

206
Drug Case : १६ वर्षांनी तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पुन्हा तुरुंगात

१६ वर्षे तुरुंगात राहून बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा ड्रग्सच्या बेकायदेशीर व्यवसाय प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वजहुल चौधरी असे १६ वर्षांनी पुन्हा अटक झालेल्या अमली पदार्थ व्यवसायिकाचे नाव आहे. (Drug Case)

नवी मुंबई पोलिसांकडून नुकताच खोपोली येथील ढेकू एमआयडीसी (MIDC) या ठिकाणी एका बंद फॅक्टरीवर छापा टाकण्यात आला होता. या छापेमारी दरम्यान पोलिसांनी मुंब्रा आणि बदलापूर या ठिकाणी राहणाऱ्या ६ जणांना अटक केली आहे. दरम्यान पोलिसांनी ५ कोटी ३९ लाख रुपये किमतीचा मॅफेड्रोन (Mephedrone) (MD) तसेच एमडी (MD) तयार करण्यासाठी लागणारी केमिकल पावडर (Chemical powder) आणि रासायनिक द्रव्य असा एकूण ४५ लाख रुपयांचा कच्चा माल आणि २३ लाखाची महिंद्रा कंपनीची ‘थार’ जीप, इर्टीका कार आणि ९ मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते. (Drug Case)

(हेही वाचा – Shreyas Iyer : आयपीएलच्या पुढील हंगामात श्रेयस अय्यर कोलकाता संघाचा कर्णधार )

इथे सुरु होते एमडीचे उत्पादन 

अटक करण्यात आलेल्या ६ आरोपींपैकी वजहुल चौधरी (Vajuhal Chaudhary) याला १६ वर्षांपूर्वी डीआयआरने (DIR) अटक केली होती. १६ वर्षे तुरुंगात राहिल्या नंतर काही महिन्यांपूर्वी त्यांची तुरुंगातून सुटका झाली आहे, तसेच सैफुला शेख उर्फ शैफ बटाटा याच्यावर नाशिक शहरात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती नवी मुंबई पोलिसांनी दिली आहे. वजहुल आणि सैफुला हे दोघे खोपोली ढेकू एमआयडीसी (MIDC) येथील एका बंद असलेल्या रासायनिक फॅक्टरीत मॅफेड्रोन (MD) या अमली पदार्थाचे उत्पादन काढत होते. (Drug Case)

न्यू इअर पार्टीसाठी एमडी बनविण्याची तयारी होती सुरू

३१ डिसेंबर रोजी होणाऱ्या न्यू इअर पार्टी साठी या टोळीची एमडी बनविण्याची तयारी सुरू होती. एमडी (MD) या अमली पदार्थाला मोठी मागणी असल्यामुळे तसेच सध्या महाराष्ट्रतील अनेक एमडीच्या बेकायदेशीर फॅक्टरीवर अमली पदार्थ विरोधी शाखा, मुंबई गुन्हे शाखा आणि एनसीबी (NCB) यांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे एमडी (MD) या अमली पदार्थाचे उत्पादन कमी झाले होते. एमडीला (MD) मोठी मागणी असल्यामुळे एमडीची (MD) किंमत देखील वाढली असल्यामुळे चौधरी आणि सैफुला यांनी मागील काही महिन्यांपासून एमडीचे (MD) उत्पादन सुरू केले होते अशी माहिती समोर आली आहे. (Drug Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.