जिवलग मित्राच्या निधनामुळे ‘त्याने’ स्वत:चीही जीवनयात्रा संपवली

120

हृदयविकारामुळे मित्राचा मृत्यु झाला, त्याचा विरह सहन होत नसल्यामुळे एका जिवलग मित्राने स्वतःची जीवनयात्रा संपवल्याची ह्रदयद्रावक घटना शनिवारी सकाळी मुलुंड येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यु नोंद केली आहे.

एकटा रडत बसायचा 

मयुर रमणीकलाल ठक्कर (४२) असे आत्महत्या केलेल्या मित्राचे नाव आहे. मयूर ठक्कर हे पत्नी व मुलांसह मुलुंड पश्चिम येथील सरोजिनी नायडू रोडवरील ओधमराम सोसायटीत राहत होते. जुन्या मोटारी घेणे आणि विकणे यांचा व्यवसाय करणारे मयूर ठक्कर यांचा मित्र अत्यंत जवळचे जिवलग मित्र निलेश माळी यांचा १२ दिवसांपूर्वी ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. मित्राचे अचानक सर्वांना सोडून जाणे मयूर ठक्कर यांना सहन झाले नाही व जिवलग मित्राच्या मृत्यूनंतर मयूर ठक्कर हे वैफल्यग्रस्त झाले होते, मित्राचा विरह त्यांना सहन होत नव्हता, ते सतत त्याच्या आठवणीत एकट्यात रडत असायचे.

(हेही वाचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळासमोर राहुल गांधींना ‘जोडे मारो’ आंदोलन )

गळफास लावून आत्महत्या

पत्नी आणि मुलांनी त्यांना समजावले, त्यांना धीर दिला मात्र मयूर हे त्यातून सावरले नव्हते अशी माहिती मयूर यांच्या पत्नी ज्योत्स्ना ठक्कर यांनी पोलिसांना दिली. शनिवारी सकाळी ७ वाजता पत्नी ज्योत्स्ना कामानिमित्त घराबाहेर पडल्या होत्या, व मुलगा मावशी गेला होता. मयूर ठक्कर हे घरात एकटेच होते. पत्नी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घरी परतल्यावर त्यांनी त्यांच्याकडे चावीने घराचे दार उघडले असता पती मयूर यांनी राहत्या घरात स्वतःला गळफास लावून घेतला होता. पतीला या अवस्थेत बघून पत्नीने आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावून त्यांना मयूर यांना खाली उतरवून अग्रवाल रुग्णालय या ठिकाणी आणले परंतु डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याचे वपोनी कांतीलाल कोथमिरे यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.