आज एक बातमी आली आहे. झिशान सिद्दीकी यांचे वक्तव्य तोडून वापरले जात आहे. माझे यात नाव नाही. झिशान सिद्दीकी यांनी, बाबा सिद्दीकींची हत्या झाली. त्या दिवशी माझे त्यांच्याशी बोलणे झाल्याचे सांगितले. बाबा सिद्दीकी हे माझे चांगले मित्र होते. आम्ही गेल्या 15 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो. ते एनडीए आघाडीचा भाग होते. आम्ही दोघे नेहमी एकमेकांशी बोलायचो, यामध्ये अनेकदा निवडणुकीचा विषयही असायचा. बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली तेव्हा मला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी मी त्यांच्या कुटुंबीयांना धीर देण्यासाठी रुग्णालयात गेलो होतो. दुर्दैवाने आम्ही सगळ्यांनी बाबा सिद्दीकी यांच्यासारखा मित्र गमावला. याप्रकरणातील सत्य बाहेर येईल आणि योग्य तो न्याय होईल, असे निवेदन मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी प्रसारित केले आहे.
(हेही वाचा – Ind vs Eng, 3rd T20 : इंग्लंड विरुद्ध मलिकेतून नितिश कुमार दुखापतीमुळे बाद, गंभीरसाठी इशारा?)
अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची गेल्यावर्षी दसऱ्याच्या दिवशी 12 ऑक्टोबरला वांद्र्याच्या कलानगर परिसरातील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्याविषयी झिशान सिद्दीकी यांनी पोलीस जबाबात मोहित कंबोज यांचा उल्लेख केला आहे. या पार्श्वभूमीवर आता मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी एक निवेदन जारी करुन बाजू स्पष्ट केली आहे. मोहित कंबोज हे भाजपचे नेते आहेत.
मोहित कंबोज यांच्या नावाचा उल्लेख बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या डायरीत केला होता. त्यांच्या डायरीत शेवटचे नाव मोहित कंबोज होते. झिशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांनी पोलिसांना जबाब दिला होता. या जबाबात त्यांनी अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा केला होता. बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली त्या दिवशी मोहित कंबोज यांच्याशी त्यांचे व्हॉटसअॅपवरवरून बोलणे झाले होते. या संभाषणानंतर बाबा सिद्दीकी यांनी त्यांच्या डायरीत मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांचे नाव लिहले होते. यानंतर काही वेळाने कार्यालयाबाहेर पडताच लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या गुंडांनी बाबा सिद्दीकी यांच्या गोळ्या झाडल्या होत्या.
झिशान सिद्दीकी यांनी काय म्हटले आहे ?
झिशान सिद्दीकी जबाबात म्हटले आहे की, माझ्या वडिलांना रोज डायरी लिहण्याची सवय होती. या डायरीत त्यांनी या सगळ्या बिल्डर्सची नावे लिहून ठेवली आहेत. 12 ऑक्टोबरला जेव्हा बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली, त्या दिवशी आपल्या वडिलांनी डायरीत एक शेवटचे नाव लिहले होते. हे नाव म्हणजे मोहित कंबोज. यानंतर माझ्या वडिलांनी मोहित कंबोज यांच्यासोबत व्हॉटसअॅपवर चॅटिंगही केले होते. पण माझ्या वडिलांनी डायरीत मोहित कंबोज यांचे नाव का लिहले, हे मी सांगू शकत नाही. त्यामुळे या गोष्टीचा तपास होणे गरजेचे आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community