एम्स रुग्णालयावर सायबर हल्ला! ४ कोटी नागरिकांचा डेटा डार्क वेबवर?

113

दिल्लीमधील एम्स रुग्णालयात २३ नोव्हेंबर २०२२ रोजी सर्व्हर हॅक आणि डेटाबेस करप्ट झाल्याने रुग्णालय प्रशासनासह डॉक्टर, रुग्णांच्या नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. हॅकर्सने सर्व्हर बहाल करण्यासाठी क्रिप्टो करन्सीमध्ये २०० कोटींची मागणी केली.

( हेही वाचा : एसटी कर्मचारी संघटनेचा आंदोलनाचा इशारा; ८८ हजार एसटी कर्मचाऱ्यांची पीएफ रक्कम रखडली)

४ कोटी रुग्णांचा डेटा चोरीला

दिल्लीच्या एम्स रुग्णालयातील ६ हजारांहून अधिक संगणकामधील डेटा आणि ४ कोटी रुग्णांचा डेटा चोरी झाला होता. एम्समध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, सोनिया गांधी, मनमोहन सिंग, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक दिग्गजांवर उपचार करण्यात आले आहेत. या सर्वांची माहिती या सर्व्हरमधून हॅक झाली.

सॉफ्टवेअर हॅकिंग टूल रॅन्समवेअरच्या माध्यमातून सायबर हल्ला केला जातो. या माध्यमातून कोणत्याही संस्थेची संगणक यंत्रणा ठप्प केली जाते. यंत्रणा ठप्प करून या बदल्यात खंडणी मागितली जाते. संबंधित कंपनीने खंडणी न दिल्यास संस्थेच्या फाईल्स करप्ट किंवा खराब केल्या जातात. अनेकदा हा डेटा डार्क वेबवर सुद्धा विकला जातो. डार्क वेब हे सायबर गुन्हेगारीशी निगडित आहे.

आरोग्याशी निगडित महत्त्वाची माहिती रुग्णालयाच्या सर्व्हरमध्ये असते. त्यात एम्स ही महत्त्वाची संस्था आहे याठिकाणी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना उपचार दिले गेले आहेत. ही माहिती सोशल मिडिया, इंटरनेटवर उपलब्ध होणार नाही म्हणूनच हॅकर्सकडून एम्स रुग्णालयाला लक्ष्य केले गेले. हा डेटा प्रामुख्याने फिटनेस-ट्रॅकिंग गॅझेट तयार करणाऱ्या कंपन्यांना हवा असतो. त्यामुळे रुग्णालय सर्व्हर हॅकिंगच्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.