राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे मुंबई सचिव सचिन कुर्मी (Sachin Kurmi) याच्यावर अनोळखी व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला, या हल्ल्यात सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला आहे. भायखळा पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून हल्लेखोराचा शोध घेण्यात येत आहे.
(हेही वाचा-Non-Agricultural Tax: राज्य सरकारचा मोठा निर्णय! राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्षावर (Sachin Kurmi) हल्ला करण्यात आला. या घटनेत तालुकाध्यक्ष सचिन कुर्मी यांचा मृत्यू झाला आहे. भायखळा परिसरातील म्हाडा वसाहतीमागे त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. रात्री हल्ला झाल्यानंतर तत्काळ कुर्मी (Sachin Kurmi) यांना जेजे हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
(हेही वाचा-मोजक्या मुसलमानांच्या फायद्यासाठी Waqf कायद्याच्या सुधारणेला होतोय विरोध)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 12.30 च्या सुमारास घडली. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी सचिन कुर्मी जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तात्काळ पोलीस वाहनातून जेजे रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याचे पोस्टमॉर्टम केले जात आहे. (Sachin Kurmi)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community