अक्कलकोटमध्ये दर्शन घेऊन निघालेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात (Akkalkot Accident) झाला असून यामध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू (Car Accident) झाल्याची घटना घडली आहे. नवीन वर्षी देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. अक्कलकोट तालुक्यातील या भीषण अपघातात 4 भाविक जागीच ठार झाले असून इतर 7 जण जखमी आहेत. यातील जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. (Akkalkot Accident)
हेही वाचा-Manipur Violence : मणिपूरमध्ये वर्षाच्या पहिल्याच दिवशी अतिरेकी हल्ला
अक्कलकोटमध्ये (Akkalkot Accident) दर्शन घेऊन गाणगापूरकडे (Gangapur) निघालेल्या भाविकांच्या गाडीचा अक्कलकोट तालुक्यातील मैंदर्गी येथे आज (1 जाने.) सकाळी भीषण अपघात झाला. स्कोर्पिओ कार आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक बसल्याची दुर्दैवी घटना घडली. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचे देवदर्शन करुन गाणगापूरकडे जात असताना सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कारमधील 2 महिला आणि 2 पुरुष जागीच ठार झाले असून इतर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. (Akkalkot Accident)
हेही वाचा-Gas Cylinder Price : नवीन वर्षाच्या सुरूवातीला ‘कमर्शिअल गॅस सिलेंडर’च्या दरात कपात
अपघातग्रस्त सर्व भाविक नांदेड जिल्ह्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अपघातस्थळी अक्कलकोट पोलीस दाखल असून जखमींना तातडीने अक्कलकोट येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असून अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांशी देखील पोलिसांनी संपर्क साधला आहे. (Akkalkot Accident)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community