बदलापुरात अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध; Akshay Shinde चा मृतदेह घरी आणणार का? वाचा सविस्तर…

280
बदलापुरात अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध; Akshay Shinde चा मृतदेह घरी आणणार का? वाचा सविस्तर...
बदलापुरात अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध; Akshay Shinde चा मृतदेह घरी आणणार का? वाचा सविस्तर...

Jबदलापुर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचा पोलिस चकमकीत मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जेजे हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. शवविच्छेदनानंतर त्याचा मृतदेह हा कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आला आहे. मात्र, मृतदेह बदलापूरला नेमका कधी आणला जाईल, याबाबत कोणतीही स्पष्टता नाही. मात्र तरी देखील अक्षय याचे नातेवाईक बदलापूरमधील त्याच्या घराच्या परिसरात जमलेले आहेत.

अक्षय शिंदेचं घर महिन्याभराने उघडलं
तब्बल एक महिन्यानंतर अक्षय शिंदेचे (Akshay Shinde) बदलापूर इथले घरही उघडण्यात आले आहे. घरात एक दिवा नातेवाईकांना लावला आहे. शिवाय परिसरात सध्या तणावाचे वातावरण आहे. आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूरच्या खरवई परिसरात राहात होता. त्याचे तिथे छोटे घर आहे. हे प्रकरण झाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या घराचीही लोकांनी तोडफोड केली होती. तेव्हा पासून त्याचे घर हे बंद होते. त्याच्यावर बदलापूर इथेच अंत्यसंस्कार होणार आहेत. हे समजल्यानंतर त्याचे नातेवाईक बदलापूर इथल्या त्याच्या घरी दाखल झाले आहेत.

नातेवाईक काय म्हणाले?
नातेवाईक घराबाहेर मृतदेहाची वाट पाहात आहेत. मात्र त्याचा मृतदेह बदलापूरला येणार आहे की नाही याची काही माहिती त्याच्या नातेवाईकांना नाही. आता आम्हाला विचारून काय करता? आम्हाला काहीच माहित नाही, मृतदेह आणणार आहेत की नाही याचीही कल्पना नाही. मात्र आपण इथे आलो आहोत असं त्यांनी सांगितलं. शिवाय त्याचे घरही एक महिन्यानंतर उघडले आहे. काही नातेवाईक घराबाहेर बसून आपले दुख: व्यक्त करत आहेत. पण खुले पणाने बोलण्यास कोणीही तयार नाही अशी स्थितीत आहे. शिवाय परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. (Akshay Shinde)

बदलापुरात अंत्यसंस्कार करण्यास स्थानिकांचा विरोध
अक्षय शिंदेवर बदलापुरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करायला स्थानिकांनी विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थितीत अक्षय शिंदे याचे अंत्यसंस्कार मांजर्ली स्मशानभुमीत होऊ देणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतला आहे, तर पोलिसांनी मात्र अंत्यसंस्काराला कोणीही विरोध करू शकत नाही असं म्हटलं आहे. त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस विशेष खबरदारी घेत आहेत. अक्षयचा मृतदेह पुरण्यासाठी जागा मिळत नसल्याची तक्रार कुटुंबीयांनी कोर्टात केल्यानंतर जागा उपलब्ध करून देणार असल्याचे सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितले आहे. (Akshay Shinde)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.