बदलापूर येथील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याने पोलिसांकडील बंदूक हिसकावरू घेत पोलिसांवर गोळीबार केल्याची घटना घडली. यामध्ये एक पोलीस अधिकारी नीलेश मोरे जखमी झाले आहेत, तर अक्षय शिंदे (Akshay Shinde) याने केलेल्या गोळीबारानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला असता अक्षय शिंदे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेवर आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) यांनी प्रतिक्रिया दिली. (Akshay Shinde Death)
मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले ?
“बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या पहिल्या पत्नीने त्याच्यावर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला होता. त्या संदर्भातील तपासासाठी पोलीस त्याला घेऊन जात होते. याच दरम्यान अक्षय शिंदे याने एपीआय निलेश मोरे यांच्यावर गोळीबार केला. यामध्ये पोलीस अधिकारी निलेश मोरे हे जखमी झाले आहेत. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती मला समजली आहे. या सर्व घटनेबाबत पोलीस तपासानंतर अधिक माहिती समोर येईल”, असं मुख्यमंत्री शिंदे (CM Eknath Shinde) यांनी म्हटलं आहे.
(हेही वाचा – तिरुपती देवस्थान मंडळ सदस्य Milind Narvekar यांच्या राजीनाम्याची शिवराज्याभिषेक समितीची मागणी)
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadanvis) म्हणाले की, त्यांनी पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केला, ज्यामध्ये पोलिसांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी प्रत्युत्तर दिले. यामध्ये अक्षय शिंदे (Akshay Shinde Death) याचा गोळी लागून मृत्यू झाला. (Akshay Shinde Death)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community