बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काऊंटरमध्ये (Akshay Shinde Encounter) मृत्यू झाला. या प्रकरणाची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आज (20 जाने.) पार पडली. यावेळी न्यायाधीशांनी महत्त्वाचं निरिक्षण नोंदवलं आहे. ठाणे दंडाधिकारी चौकशी अहवालात या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं न्यायालयाने नोंदवलं आहे. बार अॅन्ड बेंचने (Bar and Bench) यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. (Akshay Shinde Encounter)
अहवालात काय ?
न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचे न्यायालयात वाचन केले. यामध्ये अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख आहे. अक्षय शिंदे (Akshay Shinde) याला बदलापूरच्या दिशेने नेत असताना त्याने मुंब्रा बायपासनजीक गाडीतच पोलिसांची रिव्हॉल्व्हर हिसकावून घेतली. यामधून त्याने पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. त्यानंतर पोलिसांन स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात अक्षयचा मृत्यू झाला, असा दावा पोलिसांकडून करण्यात आला होता. मात्र, चौकशी अहवालात अक्षय शिंदे याला बनावट चकमकीत मारण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. या बनावट चकमकीतील पाच पोलीस कर्मचाऱ्यांनी आपल्या बळाचा गैरपद्धतीने वापर केला. त्यामुळे हे पाच पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत, असे संबंधित अहवालात नमूद करण्यात आले आहे. (Akshay Shinde Encounter)
पोलिसांचा आत्मसंरक्षणासाठी गोळीबार केला हा दावा संशयास्पद
या अहवालात म्हटल्याप्रमाणे, अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्व्हरवर आढळून आलेले नाही. मात्र, पोलिसांनी अक्षयकडील रिव्हॉल्व्हर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केला होता. मात्र, या अहवालामुळे पोलिसांचे पितळ उघडे पडले आहे. पोलिसांचा आत्मसंरक्षणासाठी आम्ही अक्षयवर गोळीबार केला हा दावा संशयास्पद असल्याचे अहवालात म्हटले आहे. अक्षय शिंदे याचा चकमकीत मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळावरुन जमा केलेली सामुग्री आणि एफएसएल रिपोर्टनुसार, अक्षय शिंदे याच्या आई-वडिलांनी केलेले आरोप योग्य आहेत. अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी पाच पोलीस कर्मचारी जबाबदार आहेत, असेही या अहवालात म्हटले आहे. (Akshay Shinde Encounter)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community