Aligarh Muslim University मध्ये विद्यार्थ्यांना जेवणात गोमांस देण्याची सूचना; व्हायरल निवेदनानंतर हिंदू संघटना आक्रमक

407

दहशतवाद्यांना आणि देशविरोधी कारवायांना पाठिंबा देण्यासाठी कुप्रसिद्ध झालेल्या अलिगड मुस्लिम विद्यापीठाने (एएमयू) पुन्हा एकदा हिंदूंना भडकवण्याचे काम केले आहे. आता विद्यार्थ्यांना गोमांस (beef) दिल्याची माहिती समोर आली आहे. एएमयूच्या वसतिगृहातील सूचनेत म्हटले आहे की, रविवारच्या जेवणाच्या मेनूमध्ये बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार चिकन बिर्याणीऐवजी बीफ बिर्याणी (Beef Biryani) दिली जाईल. (Aligarh Muslim University)

सुलेमान हॉल नावाच्या वसतिगृहाने इंग्रजीत जारी केलेल्या नोटीसवर सिनियर फूड डायनिंग हॉलचे मोहम्मद फैजउल्लाह आणि मुजासिम अहमद भाटी यांची नावे आहेत. अलीगढ मुस्लिम विद्यापीठात मुलांसाठी आणि मुलींसाठी २० वेगवेगळी वसतिगृहे आहेत. येथे दिवसातून तीन वेळा जेवण दिले जाते. ही सूचना सुलेमान वसतिगृहासाठी जारी करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Andaman च्या सेल्युलर जेलबाहेरील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची दुरवस्था; सावरकरप्रेमींनी व्हिडिओद्वारे लक्ष वेधत प्रशासनाकडे केली देखभाल करण्याची मागणी)

ही नोटीस जारी झाल्यानंतर एकच गोंधळ उडाला आहे. हिंदू नेत्यांनी एएमयूच्या कुलगुरूंवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. हिंदूंच्या (Hindu) श्रद्धेशी कोणत्याही प्रकारची छेडछाड होऊ दिली जाणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, हिंदू विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की हे प्रकरण तात्काळ हाती घेतले पाहिजे आणि जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली पाहिजे. जर असे झाले नाही तर त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या प्रकरणात, वसीम अहमद म्हणतात की, सुलेमान हॉलमधील जेवणाच्या मेनूबाबत माहिती जारी करण्यात आली होती. यात टायपिंग मिस्टेक झालेली आहे. मेनूमध्ये कोणताही बदल झालेला नाही. जुन्या मेनूनुसार जेवण विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. 

(हेही वाचा – Dhule Drugs Case: ड्रग्जविरुद्ध मोठी कारवाई, तीन एकरात लागवड केलेला ११ टन गांजा जप्त)

दरम्यान गोमांस जेवणात दिले जाणार असल्याची माहिती व्हायरल झाल्यानंतर अलीगढ पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. तसेच कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी नोटीस जारी करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दोडपूर चौकीचे प्रभारी जितेंद्र धामा यांच्यावर भावना दुखावल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.