पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेसाठी काम करणाऱ्या कुर्ल्यातील अमान शेख विरोधात राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एनआयए विशेष न्यायालयात गुरुवारी पुरवणी आरोपी पत्र दाखल केले आहे. अमान शेखच्या मार्फत पाकिस्तान गुप्तचर संघटनाने (PIO) भारतीय नौदलातील कर्मचाऱ्याला हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा कट आखला होता असे एनआयएच्या आरोपपत्रात म्हटले आहे. (NIA)
अमान सलिम शेख (२३) हा मुंबईतील कुर्ला परिसरात राहण्यास आहे. राष्ट्रीय तपास संस्था (NIA)ने नोव्हेंबर २०२३मध्ये कुर्ला येथून अटक केली होती. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा अमान शेख विरुद्ध एनआयएने भारतीय दंड संहिता (IPC) आणि बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला. एनआयएच्या तपासात असे समोर आले आहे की, कुर्ला येथील डिलिव्हरी बॉय अमान शेख हा उस्मान नावाच्या संशयित पाकिस्तानी एजंटला सक्रियपणे सहकार्य करत होता. याव्यतिरिक्त, शेख पाकिस्तानी गुप्तचरांनी नेमून दिलेली कार्ये पार पाडण्यासाठी क्रिप्टोकरन्सी चॅनेलद्वारे मीर बालाज खान आणि अल्वेन यांच्यासह इतर संशयित पाकिस्तानी कार्यकर्त्यांकडून निधी प्राप्त करत होता. (NIA)
तपासादरम्यान, NIA ला आढळले की शेख २०१७-१८ मध्ये कोविडच्या अगोदर तो त्याच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेला होता, त्या ठिकाणी तो पाकिस्तान गुप्तचर संघटनेच्या (PIO) उस्मानला भेटला आणि त्याच्यासाठी काम करू लागला. उस्मान व्यतिरिक्त तो इतर अनेक पीआयओ एजंट यांच्या संपर्कात होता. उस्मानच्या सूचनेनुसार, त्याने काही बनावट दस्तऐवज-आधारित सिमकार्ड्सची व्यवस्था केली आणि ती सक्रिय केली, जी पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी (पीआयओ) वापरत होते. एनआयएच्या पथकांनी गेल्या वर्षी शेखच्या कुर्ल्यातील निवासस्थानातून दोन मोबाईल फोन जप्त केले होते, ज्यामध्ये संवेदनशील कागदपत्रे सापडली होती. (NIA)
(हेही वाचा – आमदारांना मिळणाऱ्या पेन्शनपासून Nilesh Lanke राहणार वंचित?)
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान, पाकिस्तानी एजंटांनी विशाखापट्टणममध्ये भारतीय नौदलाच्या अधिकाऱ्यांना हनीट्रॅप केले असल्याचे समोर आले आहे. शेखने या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि तो एस्कॉर्ट सेवेच्या संपर्कात होता, हे एस्कॉर्ट्स विशाखापट्टणममधील नौदलाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्याची योजना आखत होता जे हेरगिरीच्या कारवायांमध्ये गुंतले होते आणि संरक्षणाशी संबंधित संवेदनशील महत्त्वाची माहिती पाकिस्तानी हँडलर्सना पाठवले जात होते. १९ जुलै २०२३ रोजी एनआयएने फरार पाकिस्तानी नागरिक मीर बालाज खानसह दोन आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. (NIA)
एनआयएच्या आरोपपत्रानुसार, विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्ड येथे इलेक्ट्रिकल आर्टिफिसर रेडिओ अप्रेंटिस (ईएसी) म्हणून काम करणारा अटक आरोपी आकाश सोलंकी भारतीय नौदलाच्या युद्धनौका आणि पाणबुड्यांशी संबंधित गुप्त माहिती देत होता. तो ‘अदिती चौहान’ या गृहित ओळखीनुसार कार्यरत असलेल्या संशयित पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी तसेच इतर अनोळखी व्यक्तींसोबत माहिती पुरवत होता. एनआयएच्या तपासात पुढे असे समोर आले आहे की, आकाश सोलंकी फरार आरोपी आणि पाकिस्तानी ऑपरेटर मीर बालाज खान यांच्याकडून माहितीच्या बदल्यात क्रिप्टो चॅनेलद्वारे आर्थिक नुकसान भरपाई घेत होता. ६ नोव्हेंबर २०२३ रोजी, एनआयए (NIA) ने याच प्रकरणात मनमोहन सुरेंद्र पांडा आणि अल्वेन या दोन अन्य आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. पांडा अटकेत असताना, अल्वेन हा पाकिस्तानी गुप्तचर अधिकारी फरार असून तो पाकिस्तानमध्ये असल्याचे समजते. (NIA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community