America and Canada : अमेरिका आणि कॅनडा देशातील नागरिकांना शेकडो कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

250
America and Canada : अमेरिका आणि कॅनडा देशातील नागरिकांना शेकडो कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
America and Canada : अमेरिका आणि कॅनडा देशातील नागरिकांना शेकडो कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
अॅमेझॉन कंपनीतुन  (Amazon) बोलत असल्याचे भासवून अॅमेझॉनवर तुमची ऑर्डर आली असल्याची बतावणी करत बँक खात्यांची माहिती मिळवून या खात्यावर संशयास्पद झाल्याचे सांगत अमेरिका आणि कॅनडा (America and Canada) देशातील नागरीकांना शेकडो कोटी रुपयांना गंडा घालणाऱ्या एका टोळीचा गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने पर्दाफाश करत सात आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी या आरोपींजवळून सात लॅपटॉप, सात चार्जर, एक राऊटर, सात हेडफोन आणि सहा मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. (America and Canada)
गोरेगाव पूर्वेकडील आरे कॉलनीमध्ये असलेल्या रॉयल पाम येथील एका इमारतीमध्ये एक कॉल सेंटर असून येथून अमेरिका आणि कॅनडा (America and Canada) देशातील नागरिकांना इंटरनेटद्वारे कॉलच्या माध्यमातून गंडा घालत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ला मिळाली होती. त्यानुसार, कक्ष ११ च्या पथकाने छापेमारी करुन शफीक सिराज बडगुजर, शामसुंदर जैस्वाल, निखिल कक्कर, सुधाकर पांडे, संजयकुमार राईदास, मोहीत पटनायक, करण गुप्ता यांना ताब्यात घेत अटक केली आहे. तर, टोळीचे मुख्य सूत्रधार आणि कॉलसेंटरचे मालक जिग्नेश चौहान, सुरज सिंग आणि परिक्षीत पांड्या यांचा पोलीस शोध घेत आहेत. (America and Canada)
कॉल सेंटरमधून एक जण अमेरिका आणि कॅनडा (America and Canada) देशातील नागरिकांना इंटरनेटद्वारे कॉल करत अमेझॉनमधुन (Amazon) बोलत असल्याचे भासवून त्यांचा विश्वास संपादन करत होता. हा कॉलर त्यांना तुम्ही अमेझॉनमधून अॅपल (Amazon) मोबाईल (Mobile), लॅपटॉप (Laptop), टॅब (tab) अशा वस्तु ऑर्डर केल्या असल्याचे सांगून ऑर्डर स्वीकारली नाही तरी तुम्हाला तेवढी रक्कम भरावी लागेल. ऑर्डर रद्द करायची असल्यास त्यांच्याकडून त्यांच्या बँक खात्याची माहिती घेत होता. पुढे, त्यांच्या खात्यावर बऱ्याच ऑर्डर झाल्या असल्याचे सांगुन या ऑर्डर ड्रग्ज ट्राफीकींग आणि मनी लॉड्रिंग सारख्या क्रिमिनल अॅक्टीव्हीटी असल्याने त्याची माहिती कॅनडा गव्हर्नमेंट ऑर्थरीटीला कॉल ट्रान्सफरद्वारे देत आहोत अशी भीती घालायचे. (America and Canada)
नागरिक घाबरल्याची खात्री पटल्यानंतर कॉल सेंटरमधील दुसरा व्यक्ती कॅनडा गव्हर्नमेंटच्या क्राऊन अॅटर्नी जनरल ऑर्थरीटी असल्याचे भासवून कारवाईची भिती घालुन त्यांना त्यांचे बँक खाते सुरक्षित नसल्याचे सांगत होते. त्यानंतर खात्यावरील सर्व रक्कम काढायला लाऊन ‘टेक्स्ट नाऊ’ या अॅप्लीकेशनच्या माध्यमातून बिटकॉईन वॉलेट अॅड्रेसचा क्यूआर कोड पाठवत होते. नागरिकांना हा क्यूआर कोड स्कॅन करायला लावत स्वतःच्या वॉलेटमध्ये पैसे डिपॉझिट करून घेत फसवणूक करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. (America and Canada)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.