
अमेरिकेच्या फ्लोरिडा (Florida university Shooting ) युनव्हर्सिटीमध्ये गुरुवारी(दि.१७) गोळीबाराची घटना घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याविषयी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत ५ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णायात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका संशियतला अटक देखील केली आहे. गोळीबार करणारा तरुण हा ‘शेरिफ’च्या एका महिलेचा मुलगा आहे. अमेरिका आणि इतर काही देशांमधील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ‘शेरिफ’वर असते. (Florida university Shooting )
On April 17, 2025, a shooting occurred at Florida State University (FSU) in Tallahassee: an attacker killed at least one person and injured five others, pic.twitter.com/uup71R3Ljx
— Vegas (@vegasyx) April 17, 2025
गोळीबाराच्या घटनेविषयी पोलिसांनी माहिती देताना सांगितले की, “मृतांमध्ये विद्यापीठाचे विद्यार्थी नव्हते ” जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. विद्यापीठाने अलर्ट जारी केला होता की विद्यार्थी संघटनेजवळ गोळीबार होत आहे आणि पोलिस घटनास्थळी प्रतिसाद देत आहेत. यानंतर, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या गाड्या तातडीने विद्यापीठाकडे रवाना झाल्या. (Florida university Shooting )
I am a current student at Florida State University. This is the video I took while being escorted out by police. I was in class when the shooting started, in the building next to where the sh**ters were. pic.twitter.com/TfuRbp2301
— Holden Mamula (@ignqiny) April 17, 2025
फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या टालाहासी कॅम्पसमध्ये स्टुडंट युनियनजवळ बंदूकधारी असल्याची माहिती मिळताच, संपूर्ण कॅम्पस तात्काळ लॉकडाऊन करण्यात आला. या कॅम्पसमध्ये ४२,००० हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात. खबरदारी म्हणून, सर्व विद्यापीठ वर्ग आणि कार्यक्रम रद्द करण्यात आले. विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी कॅम्पसमध्ये नसलेल्यांना तिथे जाऊ नका आणि त्या परिसरापासून दूर राहण्यास सांगितले. जर कोणाला मदत हवी असेल तर त्यांनी ९११ वर कॉल करावा किंवा फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटी पोलिसांशी संपर्क साधावा. (Florida university Shooting )
#BREAKING: Mass-shooting at Florida State University, at least 4 shot.
Story developing. pic.twitter.com/B3gyhv7LIl
— Insider Wire (@InsiderWire) April 17, 2025
संपूर्ण विद्यापीठात आपत्कालीन सतर्कता जारी करण्यात आली. यामध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी राहण्यास सांगण्यात आले. पहिल्या संदेशात विद्यापीठाने लिहिले की, “पोलीस घटनास्थळी आहेत किंवा लवकरच येतील. सर्व दरवाजे आणि खिडक्या बंद करा आणि त्यांच्या जवळ जाऊ नका.” नंतर आलेल्या अलर्टमध्ये असेही म्हटले होते की पुढील सूचना मिळेपर्यंत सर्व लोकांनी आतच राहावे. (Florida university Shooting )
हेही पहा-
Join Our WhatsApp Community