Amol Kirtikar ED Summons: अमोल किर्तीकर यांना खिचडी घोटाळाप्रकरणी ईडीकडून पुन्हा समन्स

महाविकास आघाडी सरकारने कोविड-19 महामारीच्या काळात अडकलेल्या हजारो स्थलांतरितांना पौष्टिक आहार देण्याचे कंत्राट दिले होते.

192
Amol Kirtikar ED Summons: अमोल किर्तीकर यांना खिचडी घोटाळाप्रकरणी ईडीकडून पुन्हा समन्स

शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदार अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar ED Summons) यांना अंमलबजावणी संचालनालयाने चौकशीसाठी समन्स बजावले आहे. कोविड खिचडी घोटाळ्याचा त्यांच्यावर आरोप आहे. किर्तीकर सोमवारी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहणार आहेत.

लोकसभा निवडणूकीच्या पूर्व संध्येला अमोल कीर्तिकर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोविड- १९ खिचडी घोटाळ्या प्रकरणात ईडीने (अंमलबजावणी संचालनायला) मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील पक्षाचे उमेदवार शिवसेना (UBT) नेते अमोल कीर्तिकर यांना नवीन समन्स जारी केला आहे. खिचडी घोटाळा प्रकरणात बृहन्मुंबई महानगरपालिकेशी संबंधित आहे. महाविकास आघाडी (MVA) सरकारने कोविड-19 महामारीच्या काळात अडकलेल्या हजारो स्थलांतरितांना पौष्टिक आहार देण्याचे कंत्राट दिले होते.

(हेही वाचा – Lok Sabha Elections 2024: निवडणुकीनिमित्त मोदींच्या राज्यभरात १० सभा, पहिली सभा सोमवारी चंद्रपूरमध्ये)

MVA सरकार पाडल्यानंतर, EOW ने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये ६.३७ कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात संजय राऊत यांचे सहकारी सुजित पाटकर आणि सुनील कदम यांच्यासह अनेक SS (UBT)नेत्यांविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणी बीएमसी अधिकारी आणि कॅटरिंग कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला आहे.

२७ मार्चला तिकिट मिळाल्यानंतर तासाभरात समन्स… 

शिवसेनेने (उबाठा) अमोल किर्तीकर (Amol Kirtikar ED Summons) यांना २७ मार्चला तिकिट दिले होते, मात्र नाव निश्चित झाल्यानंतर त्यांना अवघ्या काही तासाभरात ईडीचे समन्स मिळाले, त्यांना २९ मार्चला दुसरे समन्स प्राप्त झाले. ज्यामध्ये ईडीने त्यांना खिचडी घोटाळ्याप्रकरणी सोमवारी, ८ एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.