ठाणे जिल्ह्यातील बोरिवली-पडघा या शहराची जागतिक दहशतवाद्याच्या यादीवर इस्लामिक राष्ट्र म्हणून ओळख होती, तसेच जागतिक दहशतवादी संघटनेसाठी निधी उभारण्यामध्ये बोरिवली-पडघा या शहराचा मोठ्या प्रमाणात समावेश होता अशी धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास संस्था (NIA) ने नुकत्याच दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आली आहे. बोरिवली-पडघ्यातून साकिब नाचन हा इसिसचे जागतिक दहशतवादी मॉड्युल चालवत होता, साकिब नाचनला जागतिक दहशतवादी संघटनांकडून ‘अमीर-ए-हिंद’ ही उपाधी देण्यात आली होती. (NIA)
राष्ट्रीय तपास यंत्रणांने काही महिन्यांपूर्वी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या दहशतवादी संघटनेचा देशात घातपात करण्याचा कट उधळून लावत, मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, दिल्ली, उत्तर प्रदेश, झारखंड आणि उत्तराखंड येथून इसिसचे आंतरराष्ट्रीय मॉड्युल मोडीस काढले आहे. मुंबई जवळील ठाणे जिल्ह्यातील बोरिवली-पडघा येथून इसिसचा महाराष्ट्र मॉड्युलचा म्होरक्या साकिब नाचनसह पुण्यातुन अनेकांना अटक केली होती. दरम्यान या मॉड्युलचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि झारखंड येथून मोहम्मद रिझवान अश्रफ, मोहम्मद अर्शद वारसी आणि हजारीबाग (झारखंड) येथून मोहम्मद शाहनवाज आलम यांना अटक करण्यात आली होती. या तिघांचा दहशतवादी संघटनेच्या भारतविरोधी अजेंड्याला प्रोत्साहन देण्यात सक्रियपणे सहभाग होता असे तपासात समोर आले आहे. (NIA)
(हेही वाचा – World Water Day : म्हणून साजरा केला जातो जागतिक जल दिन)
एनआयएने (NIA) तिघांविरोधात गुरुवारी एनआयएच्या दिल्लीतील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे, या आरोपपत्रात या तिघांचे इसिस (ISIS) आणि आयएस (IS) या संघटनाच्या परदेशातील हँडलर्सचा सहभाग आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचे म्हटले आहे. या तिघांवर आयपीसी, यूए(पी) कायद्याच्या विविध कलमांतर्गत आरोप निश्चित करण्यात आले आहेत. एनआयएने उध्वस्त केलेल्या या इसिस मॉड्युल जवळून ‘व्हॉईस ऑफ हिंद’रुमिया’, ‘खिलाफत’, ‘दाबिक’ या सारख्या इस्लामिक आणि जिहाडी प्रचार मासिकांसह स्फोटके आणि आयईडी बनवण्याचे साहित्य जप्त केले होते, तपासात असे समोर आले की, अटकेत असलेले संशयित दहशतवादी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS) द्वारे त्यांच्या संपर्कांत असलेल्या सोबत त्यांनी आयईडी (IED) बनवण्याशी संबंधित डिजिटल फाइल्स शेअर करत होते. हे सर्व कृत्य बोरिवली-पडघा येथून सुरू होते. (NIA)
जागतिक दहशतवादी संघटनांच्या यादीवर बोरिवली-पडघा हे इस्लामिक राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले होते, या शहरात शरिया कायद्याचे पालन केले जात होते. साकिब नाचन हा येथील मुख्य होता व त्याला अमीर-ए-हिंद ही उपाधी देण्यात आली होती, दहशतवादी आणि हिंसक विचारसरणीला प्रोत्साहन देण्यासाठी पडघा येथून जागतिक दहशतवादी संघटनेसाठी निधी उभारण्यात येत असल्याचे एनआयए दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे. उत्तर प्रदेश प्रयागराज येथून अटक करण्यात आलेला संशयित मोहम्मद अश्रफ याने अटकेत असलेल्या संशयित साकिब नाचन उर्फ अमीर-ए-हिंद याच्याकडून ‘बयथ’ (निष्ठा प्रतिज्ञा) घेतली होती. लोकांमध्ये दहशत पसरवण्याच्या मोठ्या कटाचा एक भाग म्हणून अश्रफने इतर आरोपींना बायथ दिली होती. आरोपींनी भारताची सुरक्षा आणि सुरक्षितता, धर्मनिरपेक्ष आचारसंहिता आणि संस्कृती आणि लोकशाही शासन व्यवस्था धोक्यात आणण्याचा कट रचला होता असे आरोपपत्रात एनआयएने म्हटले आहे. (NIA)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community