अमरावतीत एक भीषण अपघात (Amravati Bus Accident) घडला आहे. येथे सिटी बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण दुर्घटनेत एका नऊ वर्षीय चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे गंभीर जखमी झाले आहेत. अमरावतीच्या सायन्स कोर मैदानासमोर ही घटना घडली आहे. घटनेनंतर जमावाकडून बसची तोडफोड करण्यात आली. प्रीतम गोविंद निर्मळे या ९ वर्षांच्या चिमुकल्याचा बसच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाला. (Amravati Bus Accident)
परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात
६० वर्षीय नर्मदा निर्मळे आणि १४ वर्षीय वैष्णवी संजय निर्मळे, नेहा संतोष निर्मळे या तिघांचीही प्रकृती आत्यावस्थ असल्याची माहिती आहे. जखमींवर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर परिसरात पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अमरावती सायन्स कोर परिसरातील मध्यवर्ती बस स्थानकाकडून येणाऱ्या सिटी बसचे ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झालेल्या सिटी बसणे चौघांना चिरडले. (Amravati Bus Accident)
(हेही वाचा –Crime In Maharashtra : देशातील गुन्हेगारीत महाराष्ट्र दुसर्या क्रमांकावर)
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती महानगरपालिकेच्या सिटी बसचे ब्रेक अचानक फेल झाले. ही बस तेव्हा अमरावती शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाकडून जात होती. अचानक ब्रेक फेल झाल्याने बस अनियंत्रित झाली आणि या सिटी बसने रस्त्यावरून जात असणाऱ्या चार जणांना जबर धडक दिली. नागरिकांच्या संतप्त भावना बघून पोलीस आयुक्तालयातील क्विक रिस्पॉन्स टीम सह पोलीस ठाण्यातील अनेक कर्मचारी व अधिकारी घटनास्थळी दाखल झाले यावेळी पोलिसांनी जमावाला शांत करून क्रेन साहाय्याने बसला घटनास्थळावरून हलवली. (Amravati Bus Accident)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community