उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस धमकी प्रकरणात अटकेत असलेला बुकी अनिल जयसिंघानीला मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.
https://twitter.com/ANI/status/1642774776468115458?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1642774776468115458%7Ctwgr%5E5192f3a0a5453ba5b1ac479e7fb73440c6acf069%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.latestly.com%2Fsocially%2Fmaharashtra%2Fbombay-high-court-dismisses-the-plea-of-arrested-accused-anil-jaisinghani-451062.html
यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयाने अनिल जयसिंघानीचा जामीन अर्ज फेटाळून लावला होता. पण सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात जयसिंघानी आणि त्याच्या भावाने दंडाधिकारी न्यायालयाने दिलेल्या रिमांडला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी झाली. यात अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करणाऱ्यात आला होता. पण न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावत जयसिंघानीला दिलासा नाकारला.
याचिकेत नेमके काय?
अमृता फडणवीस धमकी आणि खंडणीप्रकरणात १९ मार्चला गुजरात पोलिसांनी ग्रोधा येथून अनिल जयसिंघानी आणि त्याचा चुलत भाऊ निर्मल जयसिंघानीला ताब्यात घेतले होते. पण अहमदाबादमध्ये त्याच्याविरोधात एक गुन्हा दाखल असतानाही त्यांचा ताबा मुंबई पोलिसांना देण्यात आला होता. मात्र गुजरात येथील संबंधित दंडाधिकाऱ्यांकडून कायद्यानुसार त्यांची ट्रान्झिट रिमांड घेणे मुंबई पोलिसांना आवश्यक होते. पण मुंबई पोलिसांनी तसे काही न करता थेट त्यांना ताब्यात घेतले आणि ४० तासांनी मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात त्यांना हजर केले होते. कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला ताब्यात घेतल्यानंतर २४ तासांत संबंधित व्यक्तीला क्षेत्रिय दंडाधिकारी न्यायालयात हजर करावे लागते. याच नियमाची पुर्तता न केल्याचा दावा जयसिंघानीचे वकील मृगेंद्र सिंह यांनी उच्च न्यायालयात केला.
यावर राज्य सरकारकडून स्पष्ट केले की, अटक मेमोनुसार, जयसिंघानीला २० मार्चला संध्याकाळी ५ वाजता अटक केली. त्यानंतर २१ मार्चला सकाळी ११ वाजता पोलीस कोठडी कायद्यानुसार, विशेष न्यायालयात हजर केले. त्यामुळे यात कुठलीही अनियमितता नाही.
(हेही वाचा – पुण्यात कोयता गॅंगची दहशत! अल्पवयीन मुलांकडून तरुणावर वार)
Join Our WhatsApp Community