मीरारोड नयानगर येथील घटनेनंतर मुंबईतील मुस्लिम (Muslim) वस्त्यांमधून अफवांचे मेसेजेस समाज माध्यमावर व्हायरल केले जात आहे, जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशातून काही समाजकंटकांकडून या प्रकारचे कृत्य मुद्दाम केले जात आहे. मुंबई पोलिसांकडून अफवा पसरविणाऱ्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांनी मागील तीन दिवसात जवळपास १२ गुन्हे दाखल करून पाच ते सहा जणांना अटक करण्यात आली आहे. (Muslim)
मीरारोड नयानगर या ठिकाणी २१ जानेवारी रोजी रात्री श्रीराम प्राणप्रतिष्ठान मिरवणुकीवर ५० ते ६० मुस्लिम (Muslim) तरुणांनी हल्ला केला होता. या प्रकरणी नयानगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून जवळपास २२ जणांना अटक देखील केली आहे. पोलिसांच्या या कारवाई नंतर मुंबईसह परिसरात मुस्लिम (Muslim) वस्त्यांमध्ये समाज माध्यमातून तसेच व्हॉट्सअॅपवरून चुकीचे मेसेज व्हायरल करून अफवा पसरविण्यात येत आहे. (Muslim)
(हेही वाचा – Bihar : बिहारमध्ये श्री मारुतीच्या मूर्तीची तोडफोड; राज्यात दंगलसदृश्य स्थिती )
मागील तीन दिवसात १२ गुन्हे दाखल
मुंबई पूर्व उपनगरातील ट्रॉम्बे चिता कॅम्प, कुर्ला नेहरू नगर, गोवंडी शिवाजी नगर, मानखुर्द येथील मुस्लिम (Muslim) बहुल परिसरात काही समाजकटकांनी जातीय तेढ निर्माण करणारे मेसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल करीत असून अनेक जणांनी व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियाच्या स्टेटसवर तसेच ‘एक्स'(ट्विटर)वर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. व्हायरल व्हिडिओ तसेच अफवांचे मेसेज यावरून नागरिकांमध्ये भीतीचे तसेच असुरक्षिततेची भावना निर्माण होत असून मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी मुंबईत मागील तीन दिवसात १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. त्यात ५ ते ६ मुस्लिम (Muslim) तरुणांना अटक करण्यात आली आहे. व्हायरल करण्यात येणारे मेसेजस आणि व्हिडियो चुकीचे असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच आलेले मेसेजेस फॉरवर्ड करू नये असे आवाहन पोलीस उपायुक्त डॉ. हेमसिंग राजपूत यांनी केले आहे. (Muslim)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community