केस कापल्यानं आला राग, १३ वर्षीय मुलानं उचललं टोकाचं पाऊल

88

आजकाल लहान मुलांमध्ये आत्महत्येच प्रमाण वाढताना आपल्याला दिसत आहे. ऑनलाईन गेम, एकमेकांशी केली जाणारी स्पर्धा, तुलना यामुळे येणाऱ्या रागातून असं घडताना दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील भाईंदरमध्ये घडल्याचं समोर आलं आहे. केस कापल्याच्या रागातून १३ वर्षीय मुलानं टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवल्याची घटना घडली आहे.

बाथरूमच्या खिडकीतून मारली उडी

१३ वर्षीय या मुलांचं नाव शञुघ्न राजीव पाठक असं होत. आठवीत शिकणाऱ्या शत्रुघ्नला त्यांच्या सख्ख्या भावानं केस कापण्यासाठी नेलं होत. यावेळी केस जास्त बारीक कापल्यानं त्याला राग आला. घरातल्या सर्व लोकांनी त्याची समजूत काढली. मात्र ती अपयशी ठरली. शत्रुघ्नने मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास १६व्या मजल्यावरील आपल्या घराच्या बाथरुमच्या खिडकीतून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेनं त्याच्या कुटुंबाला मोठा धक्काच बसला. संपूर्ण परिसरात या घटनेमुळे खळबळ माजली.

दरम्यान या अपघाती मृत्यूची नोंद नवघर पोलिसांनी घेतली असून घटनेचा पुढील तपास पोलीस यंञणा करत आहेत. घरातला सर्वात लहान आणि लाडका मुलगा गेल्यानं कुटुंबियांकडून हळहळ व्यक्त केली जाते आहे.

(हेही वाचा – धक्कादायक! पुण्यात महिलेसह तिच्या दोन मुलांची चुलत दिराने केली हत्या)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.