शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार अनिल देसाई (Anil Desai) यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने सात तास कसून चौकशी केली. शिवसेना पक्षाच्या खात्यातून ५० कोटींहून अधिकची रक्कम काढण्यात आल्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने देसाई (Anang Desai) यांच्याकडे चौकशी करण्यात आली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद निर्माण झाला होता. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे सुपूर्द केले. विधानसभा अध्यक्षांनी आमदार अपात्रताप्रकरणी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बाजूने निकाल दिला. त्यानंतर किरण पावसकर, खजिनदार बालाजी किणीकर आणि सचिव संजय मोरे यांनी ३० जानेवारीला मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन ठाकरे गटाकडून आयकर विभागाचे टीडीएस लॉग इन आणि पासवर्डचा गैरवापर सुरू असल्याची तक्रार केली होती. (Anil Desai)
(हेही वाचा- Sandeshkhali Case : सरकार पुरस्कृत महिला बलात्काराच्या घटना लज्जास्पद; अभाविपकडून मुंबई विद्यापीठ परिसरात निदर्शने)
आर्थिक गुन्हे शाखेने याची प्राथमिक चौकशी सुरु करत अनिल देसाई (Anil Desai) यांना ५ मार्चला चौकशीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते. त्यानुसार, देसाई हे मंगळवारी सकाळी ११ च्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात दाखल झाले. आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे सात तास कसून चौकशी केली. सायंकाळी सहाच्या सुमारास ते आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयातून बाहेर पडले. (Anil Desai)
“आमच्या पक्षाबद्दल तक्रार होती आणि त्यांनी प्राथमिक चौकशीसाठी बोलावले आहे,” असे देसाई यांनी आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात प्रवेश करण्यापूर्वी सांगितले. तर, चौकशीअंती कार्यालयातून बाहेर आल्यानंतर देसाई यांनी उपलब्ध माहिती पोलीस अधिकाऱ्यांना दिली आहे. प्रत्येक राजकीय पक्षाचे पदाधिकाऱ्यांचे पद असते. आम्ही पक्षाच्या घटनेनुसार काम करत आहोत,” देसाई म्हणाले. (Anil Desai)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community