अँटॉप हिल (Antop Hill Firing) येथे शनिवारी झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी विवेक शेट्टीयार (Vivek Shettiyar) याला मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) डोंबिवली पूर्व (Dombivli East) येथून अटक केली आहे. विवेक शेट्टीयार (Vivek Shettiyar) हा सराईत गुंड असून त्याच्यावर मुंबईत ९ पेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. (Antop Hill Firing)
कोविड मध्ये संचित रजेवर बाहेर पडल्यानंतर फरार झालेल्या शेट्टीयार याने शनिवारी आकाश कदम याच्यावर अँटॉप हिल (Antop Hill Firing) येथे गोळ्या झाडून फरार झाला होता. या गोळीबारात आकाश हा गंभीर जखमी झाला होता. मुंबईत खळबळ उडवून देणाऱ्या या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी विवेक शेट्टीयार (Vivek Shettiyar) फरार झाला होता.दोन दिवसांपूर्वी अँटॉप हिल (Antop Hill Firing) पोलिसांनी त्याची पत्नी फरहिम शेख (२६) हिला गुन्हेगारी कटात महत्त्वाची भूमिका बजावल्याप्रकरणी अटक केली. तपासा दरम्यान असे निष्पन्न झाले की, घटनेच्या एक दिवस अगोदर फरहीन शेट्टीयार सोबत गोरेगाव येथील एका लॉजमध्ये होते, आणि तिनेच आकाश कदम याला ठार मारण्यास विवेकला प्रवृत्त केले होते, आकाश ने विवेकला दिलेल्या पैशावरून दोघात वाद होता, आकाश हा उसनेदिलेले पैसे घेण्यासाठी विवेकच्या घरी गेला होता, त्यावेळी त्याची पत्नी घरी होती, पैशावरून दोघात शाब्दिक चकमक झाली होती, त्यातून ही घटना घडली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.दरम्यान विवेकला देशी कट्टा (पिस्तुल) मिळवून देण्यास मदत करणाऱ्याला एकाला सोमवारी अटक करण्यात आली. (Antop Hill Firing)
(हेही वाचा- Ajit Pawar: राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून गुढीपाडवा, मराठी नववर्षाच्या शुभेच्छा !)
फरार असलेल्या विवेकला मंगळवारी मुंबई गुन्हे शाखा (Mumbai Crime Branch) कक्ष ३च्या पथकाने ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथून पहाटे ताब्यात घेऊन कक्ष ४ च्या ताब्यात देण्यात आले असून विवेक याला अटक करण्यात आली आहे. आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. विवेक शेट्टीयार हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्याची नोंद आहे, गोरेगाव येथे २०१७मध्ये झालेल्या एका हत्येच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा झाली होती, तुरुंगात असलेला विवेक याने कोविड काळात संचित रजेवर तुरूंगातुन बाहेर पडला होता,तेव्हापासून तो फरार झाला होता. (Antop Hill Firing)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community