Gadchiroli Naxalist : गडचिरोली येथे माओवाद्यांकडून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त; गडचिरोली पोलिसांना मोठे यश

120
Gadchiroli Naxalist : गडचिरोली येथे माओवाद्यांकडून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त; गडचिरोली पोलिसांना मोठे यश
Gadchiroli Naxalist : गडचिरोली येथे माओवाद्यांकडून शस्त्रास्त्रांचा साठा जप्त; गडचिरोली पोलिसांना मोठे यश

गडचिरोलीमधील उपविभाग कुरखेडा अंतर्गत येत असलेल्या पोमकें बेडगाव हद्दीतील बेडगाव घाट जंगल परिसरात माओवाद्यांनी जमिनीत पुरुन ठेवलेली शस्त्रास्त्रे पोलिसांनी जप्त केली. (Gadchiroli Naxalist) माओवाद्यांनी बेडगाव घाट जंगल परिसरात स्फोटके आणि इतर साहित्य पुरून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. स्फोटकांची माहिती मिळताच पोलिसांनी डीएसएमडी उपकरणाद्वारे जंगल परिसरात शोध मोहीम सुरु केली. त्यावेळी पोलिसांना एक संशयित जागा सापडली. त्या जागेची बीडीडीएस पथकाने पाहणी केली. त्यानंतर अंदाजे दीड ते दोन फुट जमिनीमध्ये स्फोटक पदार्थ भरून ठेवलेली पिशवी पोलिसांना सापडली. त्यामधील स्फोटकांची पुढील चौकशी केली जात आहे.

(हेही वाचा – Indian Navy : नौदल प्रमुख ॲडमिरल आर हरी कुमार यांची अमेरिकेला भेट)

माओवाद्यांकडून विलय सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या काळात माओवादी शासनविरोधी विविध घातपाती कारवाया करण्यासाठी प्रयत्न करत असतात. यावेळी माओवाद्यांकडून विविध प्रकारच्या शस्त्रांचा आणि स्फोटकांचा वापर करण्यात येतो. सुरक्षा दलाल अडचणीत टाकण्यासाठी माओवाद्यांकडून ही शस्त्रास्त्रे जमिनीमध्ये पुरुन ठेवली जातात. अशा हत्यारांचा वापर मओवाद्यांकडून विविध नक्षली हालचाली करताना केला जातो. याच विलय सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (Gadchiroli Naxalist)

पोस्टे पुराडा येथील पोलीस पथकाने नक्षलविरोधात अभियान राबवताना कोरची आणि टिपागड येथील पोलीस दलाला हानी पोहचवण्याचे प्रयत्न नक्षलवाद्यांकडून करण्यात येत होते. नक्षलवाद्यांचा हाच डाव पोलिसांनी उधळून लावला. यामुळे गडचिरोली पोलिसांना यश आल्याचे सांगण्यात येत आहे. मागील काही काळात माओवादी चळवळीला धक्के बसत आहेत. केंद्रीय सुरक्षा यंत्रणांकडून माओवाद्यांची कोंडी करण्याचे काम सुरू आहे. त्याचा परिणाम माओवादी चळवळीवर होत आहे.

नक्षलवादी कमांडर संजय रावला अटक मागील २ ते ३ वर्षांपासून संजय राव याच्याकडे पश्चिम घाट विभागाची कमांडर म्हणून जबाबदारी होती. त्याला काही दिवसांपूर्वी हैदराबादमध्ये अटक करण्यात आली होती. त्यामुळे केंद्र सरकारने बंदी घातलेल्या माओवादी संघटनेला मोठा धक्का बसला होता.  पश्चिम घाटाचा कमांडर म्हणून संजय राव कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू मधील नक्षली कारवायांकडे लक्ष घालत होता. तसेच तो माओवादी पक्ष संघटनेत महत्त्वाच्या असणाऱ्या केंद्रीय समितीचा सदस्य होता. (Gadchiroli Naxalist)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.