बीड (Beed) जिल्ह्यातील गुन्हेगारीची गेल्या २ महिन्यांपासून मोठी चर्चा सुरु आहे. जिल्ह्यात १,२८१ जणांकडे शस्त्र परवाना होता. यातील काही लोक हे बीडचे रहिवासी असले तरी पुणे (Pune), मुंबईसह इतर शहरांमध्ये वास्तव्यास होते, तसेच काही लोकांवर गंभीर गुन्हे दाखल असतानाही त्यांना परवाना (Arms licenses) देण्यात आला होता. याचाच काही जण दुरुपयोग करून सण, उत्सव काळात हवेत गोळीबार करत होते. सरपंच संतोष देशमुख हत्या (santosh deshmukh case) प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड (Walmik Karad) याच्यावर गंभीर १५ गुन्हे दाखल असतानाही त्याला शस्त्र परवाना दिला होता.
(हेही वाचा – ७७ देशाच्या ११८ राजदूतांनी केले महाकुंभात स्नान; Yogi Adityanath म्हणाले, सनातन मानव धर्म)
याविषयी वर्तमानपत्रांत वृत्त प्रकाशित झाल्यावर पोलिसांच्या प्रस्तावावरून जिल्हाधिकाऱ्यांनी अगोदर १०० आणि आता ८३, असे १८३ शस्त्र परवाने रद्द केले आहेत. आणखी १२७परवाने रद्द होणार आहेत. आतापर्यतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.
जिल्ह्यात ज्यांच्याकडे परवाना आहे, त्यांचे सर्वेक्षण सुरू आहे. पोलिस कर्मचारी घरी जाऊन परवानाधारक शस्त्र हाताळण्यास सक्षम आहे का, जिवंत आहे का, याची खात्री करत आहेत. धक्कादायक म्हणजे परवाना असलेले अनेक जण मयत असल्याचे समोर आले आहे. त्यांचा आकडा ११८ असल्याचे सांगण्यात येत आहे. (Beed)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community