मालेगाव बॉम्बस्फोट २००८ (Malegaon Blast) प्रकरण कॉँग्रेसच्या राजवटीत चांगलेच तापवले होते. या प्रकरणानंतर पहिल्यांदा ‘हिंदू दहशतवाद’ अशी व्याख्या करण्यात आली. यात साध्वी प्रज्ञा सिंग, कर्नल प्रसाद पुरोहित सह एकूण 12 हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तपासानंतर बरेच संशय व्यक्त करण्यात आले. एका बाजूला मुस्लिम दहशतवाद वाढत असताना काँग्रेसने यात मुस्लिमांविषयी सहानुभूती निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक हिंदू दहशतवाद हे कुंभाड रचले, त्यासाठी मालेगाव बॉम्बब्लास्ट घडवून आणल्याचा आरोप होऊ लागला. तपासात काहीच प्रगती दिसून आली नाही म्हणून हे प्रकरण आजही न्यायप्रविष्ट राहिले आहे. ज्यामुळे या प्रकरणातील (Malegaon Blast) आरोपी सध्या जामीनावर बाहेर आहेत. परंतु आता ABI (abinewz.com) या वृत्त संकेतस्थळाने हा बॉम्बस्फोट कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमने मालेगावमध्ये येऊन घडवून आणल्याचा गंभीर खुलासा केला. यात कर्नल प्रसाद पुरोहित यांना स्वतः सैन्य अधिकाऱ्यांनी अडकवल्याचे यात म्हटले आहे.
भगवा दहशतवादाची योजना आखली
पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय, इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक, दहशतवादी दाऊद इब्राहिम आणि काँग्रेस नेत्यांनी मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Blast) घडवून आणल्याचे सिद्ध झाले आहे. ABI (abinewz.com) ने या प्रकरणात खुलासे केले आहेत, त्यातील ४ भाग प्रसिद्ध केले आहेत. पहिल्या भागात कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम हा मालेगावला आला होता आणि मालेगावमध्ये बसून त्याने बॉम्बस्फोट घडवून त्याला भगवा दहशतवादाचे नाव देण्याची योजना आखली होती, असे पहिल्या भागात म्हटले आहे. चौथ्या भागात या प्रकरणात कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांना सैन्यातील मिलिटरी इंटेलिजेंस (एमआय) चे कर्नल आरके श्रीवास्तव आणि इंटेलिजेंस ब्युरो (आयबी) चे अधिकारी संजय गर्ग यांनी फसवले, असा गंभीर स्वरूपाचा खुलासा केला आहे.
(हेही वाचा नागपूर हिंसाचारातील मास्टरमाईंड Faheem Khan याच्या घरावर फिरवला बुलडोझर)
दिल्लीला न्यायचे सांगत पुरोहितांना मुंबईत आणले
आरके श्रीवास्तव तेव्हा मिलिटरी इंटेलिजेंस-९ चे संचालक होते. ते आर्मी हेडक्वार्टर्समध्ये तैनात होते. एके दिवशी ते मध्य प्रदेशातील पंचमढी येथील एईसी ट्रेनिंग कॉलेज आणि सेंटरमध्ये पोहोचले. कर्नल प्रसाद पुरोहित आधीच येथे अरबी भाषा शिकत होते. आरके श्रीवास्तव यांनी एईसी ट्रेनिंग कॉलेज अँड सेंटरचे प्रभारी लेफ्टनंट (कर्नल) जीसी मोहंता यांना सांगितले की, त्यांना कर्नल प्रसाद पुरोहित यांना दिल्लीतील लष्करी मुख्यालयात घेऊन जावे लागेल. ही मुख्यालयातून मुव्हमेंट ऑर्डर आली आहे, असे सांगण्यात आले होते. मालेगाव बॉम्बस्फोट (Malegaon Blast) प्रकरणात काही चौकशी केल्यानंतर कर्नल प्रसाद पुरोहित यांना सोडून देतील. कर्नल प्रसाद पुरोहित हे दिल्लीतील लष्करी मुख्यालयातील लष्करी गुप्तचर संचालनालयाच्या एमआय-२० संचालकांना रिपोर्ट करणार होते. मुव्हमेंट ऑर्डरनुसार, कर्नल प्रसाद पुरोहित यांना पंचमढीहून दिल्लीला जावे लागले. पण २९ ऑक्टोबर २००८ रोजी आरके श्रीवास्तव यांनी त्यांना पंचमढीहून भोपाळ विमानतळावर टॅक्सीने आणले. भोपाळ विमानतळावरून त्यांनी कर्नल प्रसाद पुरोहित यांना मुंबईत आणले. आरके श्रीवास्तव यांनी आधीच प्रसाद पुरोहित यांचा मोबाईल हिसकावून घेतला होता. जेव्हा कर्नल प्रसाद पुरोहित यांना विचारले की, मुव्हमेंट ऑर्डर नुसार त्यांना दिल्ली मुख्यालयात जावे लागेल. आरके श्रीवास्तव यांनी कर्नल प्रसाद पुरोहित यांना जीवे मारण्याची धमकी देऊन गप्प केले. त्यांना केवळ वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यास सांगितले. आरके श्रीवास्तव हे या पदावर कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यापेक्षा वरिष्ठ होते. सैन्यातील शिस्तीला प्राधान्य दिले जात असल्याने, कर्नल प्रसाद पुरोहित गप्प राहिले. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे (एटीएस) अधिकारी आणि आयबी अधिकारी संजय गर्ग यांनी मुंबई विमानतळाबाहेर कर्नल प्रसाद पुरोहित यांना ताब्यात घेतले. सर्वांनी मिळून कर्नल प्रसाद पुरोहितला एका पांढऱ्या टाटा सुमोमध्ये गोणीसारखे फेकले, असे ABI (abinewz.com) या संकेतस्थळाने म्हटले आहे.
पुरोहितांविषयी कपट रचले
त्यानंतर आरके श्रीवास्तव यांनी स्वतःचा खोटी मुव्हमेंट ऑर्डर काढल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणात मुव्हमेंट ऑर्डरचे पालन करण्यासाठीचे नियम आणि कायदे देखील योग्यरित्या पाळले गेले नाहीत. त्यांनी कपटाने कर्नल प्रसाद पुरोहित यांना मुंबईत आणले आणि महाराष्ट्र एटीएस आणि आयबी अधिकारी संजय गर्ग यांच्याकडे सोपवले, असे ABI (abinewz.com) या संकेतस्थळाने म्हटले आहे. २९ सप्टेंबर २००८ रोजी, मुंबईपासून २०० किमी अंतरावर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मुस्लिमबहुल उपनगर मालेगावमध्ये एका मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट (Malegaon Blast) झाला. या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे १०० जण जखमी झाले.
Join Our WhatsApp Community