मुंबईत गावठी कट्टे विक्रीसाठी आलेल्या बुलढाण्यातील (buldhana) एका व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ३ (mumbai crime branch) च्या पथकाने अटक केली आहे. त्याच्या जवळून पोलिसांनी ३ गावठी कट्ट्यासह (country made revolver) ३ जिवंत काडतुसे जप्त केली आहे. (Country Made Revolver Seized)
विलास देविदास हेलोडे (३२) (vilas helode) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. हेलोडे हा बुलढाणा जिल्ह्यातील एका खेड्यात राहणारा तरुण आहे. ताडदेव येथील एका बस स्थानकाजवळ एक इसम अग्नीशस्त्र विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष ३च्या पथकाला मिळाली होती. (Country Made Revolver Seized)
(हेही वाचा – PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी मुंबई दौऱ्यावर , नेमके कारण काय जाणुन घ्या)
या माहितीच्या आधारे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. समीर मुजावर आणि पथकाने ताडदेव येथे सापळा रचून विलास हेलोडे या तरुणाला संशयावरून ताब्यात घेऊन त्याच्या जवळ असणाऱ्या बॅगेची झडती घेतली असता त्यात पोलिसांना तीन गावठी कट्टे आणि तीन जिवंत काडतुसे मिळाली. (Country Made Revolver Seized)
पोलीस पथकाने ही शस्त्रे जप्त करून विलास हेलोडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ही शस्त्रे उत्तर प्रदेश येथून आणली होती, व ती मुंबईत एका गुंड टोळीला विकण्यात येणार होती अशी माहिती समोर आल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. अटक करण्यात आलेल्या हेलोडे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली असता त्याच्यावर बुलढण्यात एक गुन्हा दाखल आहे. ही शस्त्रे कुठल्या गुंड टोळीला विकण्यात येणार होती याचा तपास गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. (Country Made Revolver Seized)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community