खेळण्यातल्या रिव्हॉल्वरचा धाक दाखवून मालकिणीच्या घरावर दरोडा; लुटले लाखो रुपये

197

दादर येथील कीर्ती कॉलेज परिसरात असलेल्या रहिवासी इमारतीतील ज्येष्ठ नागरिक महिलेच्या घरी पडलेल्या दरोड्या प्रकरणी दादर पोलिसांनी २४ तासांत दोन दरोडेखोरांना अटक केली आहे. या दोन दरोडेखोरांपैकी एक जण या ज्येष्ठ नागरिक महिलेचा खासगी वाहन चालक असून दुसरा त्याचा साथीदार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या दरोड्याच्या गुन्ह्यात १२ लाखाची लूट करण्यात आली होती.

दादर येथील कीर्ती कॉलेज जवळ असणाऱ्या एका रहिवाशी इमारतीच्या ८व्या मजल्यावर राहणाऱ्या ७० वर्षीय महिलेला रिव्हॉल्वरचा धाक दाखवून तिचे हातपाय बांधून घरातील सोन्याचे दागिने असा एकूण १२ लाख रुपये किमतीचा ऐवज लुटण्यात आला होता, सोमवारी भरदिवसा घडलेल्या दरोड्याच्या घटनेमुळे दादर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.

(हेही वाचा – ३९ वर्षांच्या नराधमाचे ७ वर्षांच्या चिमुकलीसोबत दुचाकीवर बसून अश्लील चाळे, सीसीटीव्हीत घटना कैद)

दादर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून दरोडेखोराच्या शोधासाठी पोलिसांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने तांत्रिक तपासावरून दरोडेखोरांची ओळख पटवून संतोष भागोजी कडव (३८)आणि कृष्णा भागोजी भुवड उर्फ भौड (५२) या दोघांना मंगळवारी दुपारी सानपाडा परिसरातून अटक करण्यात आली आहे. संतोष कडव हा दरोडा टाकण्यात आलेल्या घरात राहणाऱ्या महिलेच्या वाहनावर चालकांची नोकरी करीत होता. त्याने दरोड्याची योजना आखून खेळण्यातील रिव्हॉल्वर घेऊन मित्राच्या मदतीने हा दरोडा टाकल्याचे समोर आले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.